नायगाव तालुका काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाचे आजादी गौरव पदयात्राचे आयोजन !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव येथील तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वातंत्र्याच्या आजादी गौरव पदयात्रेच्या संदर्भात माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतरावजी चव्हाण यांच्यासह उपस्थितीत प्रमुख मान्यवरांच्या बैठक घेण्यात आली भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले, नांदेड जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, यांच्या आदेशानुसार नायगाव तालुका काँग्रेसच्या वतीने बैठक घेण्यात आली.

 या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव पा चव्हाण, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, माधवराव बेळगे, मोहनराव पा. धुपेकर माधवराव पा जाधव, संजय पा शेळगावकर ,मनोहर पवार, मनोज पा टाकळीकर, श्रीनिवास पाटील चव्हाण, सय्यद रहीम शेठ, नगराध्यक्ष विजय पा चव्हाण, प्राचार्य रवींद्र पा. चव्हाण, परसराम पा जाधव, स इसाक सेठ नरसीकर, सुरेश पा कल्याण, गटनेते सुधाकर पाटील शिंदे, नगरअध्यक्ष प्रतिनिधी नारायण पा जाधव, बाबुराव अडकिने, भुजंगराव पा शिंदे, गजानन चौधरी ,गुणाजी पा शिंदे, यादवराव पा भेंलोडे, संभाजी पा शिंदे , माधवराव पा शिंदे, प्रल्हाद पाटील शिंदे, गोविंदराव शिंदे सर, यासह सर्व नगरसेवक तालुक्यातील कुंटूर नरसी बरबडा मांजरम सर्कलमधील पदअधिकारी ,कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत घेतली या बैठकीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन दरम्यान राज्यभर आजादी गौरव झेंडा महोत्सव, पदयात्रा आयोजित केली आहे.
म्हणून दि १४ ऑगस्ट रविवार रोजी सकाळी ९ वाजता तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकप्रतिनिधी, पदाधिकारी , कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य पदयात्रा नरसी येथील बालाजी मंदिरापासून भगवान बालाजी चे दर्शन घेऊन नरसी ते नायगाव येथील माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयापासून शिवाजी चौक हेडगेवार चौक नायगाव येथून निघून जयराज पॅलेस मंगल कार्यालय या ठिकाणी पदयात्रेचा समारोप समारंभ आहे. पदयात्रेत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नायगाव तालुका काँग्रेस कमिटी व माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या मित्र मंडळच्या वतीने करण्यात आलेले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या