काँग्रेस पक्ष सर्वात जुना पक्ष असून सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन जाणारा पक्ष असून पदाधिकाऱ्याने शासनाकडून येणाऱ्या विविध योजना गरिबापर्यंत पोहोचवणे व पक्ष बळकटीचे काम करावे असे मत नायगाव तालुका काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमातीच्या विभागाच्या वतीने मतदार संघातील नायगाव, उमरी, तालुका कार्यकारणी निवडीचे बैठकीत अध्यक्ष भाषणात माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध प्रकारचे पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या दिनांक 20ऑगस्ट रोजी रविवारी अनुसूचित जाती जमाती विभागाची बैठक नायगाव येथे संपर्क कार्यालयात घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोहर पवार, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, मार्केट कमिटीचे सभापती श्रीनिवास पाटील चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, जिल्हा सरचिटणीस बालाजीराव मदेवाड, तालुका अध्यक्ष दत्तात्रय आईलवार सुजलेगवकर, सेवादलाचे तालुका अध्यक्ष ताटे पाटील, गजानन चौधरी,दादाराव पाटील कहाळेकर, बालाजी पाटील सावरखेडकर, उमरी तालुका अध्यक्ष दिनकर गंगाराम भंडारे, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष राजेश ढगे काँग्रेस नायगाव विधानसभा सरचिटणीस करण शिंदे ,माजी सरपंच ताटे प्रकाश माचनवाढ, श्याम भंडारे, गजानन पवार,आदी नायगाव उमरी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्ष यांनी नायगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची 5 उपाध्यक्ष, 5 सरचिटणीस ,4 सचिव ,4संघटक,3 कोषाध्यक्ष, 4 सर्कल प्रमुख असे एकूण 25 पदाधिकाऱ्यांचे निवड केली तर उमरी तालुक्यातील 1उपाध्यक्ष, 5 सरचिटणीस, 1सचिव,4 सर्कल प्रमुख,1 उपसर्कलप्रमुख,1 कोषाध्यक्ष, 1 संघटक, 6 सदस्य, असे एकूण 20 पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली व प्रत्येक पदाधिकाऱ्यांना नियुक्ती प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख मान्यवराने आपल्या पक्षाची ध्येयधोरण पक्ष वाढीबद्दल प्रत्येक कार्यकर्त्यांना सूचना केल्या ज्या कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून निवड केली, यांचे निवड करण्यात आली नाही त्या कार्यकर्त्यांनी नाराज न होता पक्ष मजबुतीच्या कामाकडे कार्य करावे त्यां कार्यकर्त्यांची विविध समित्यावर नियुक्ती करण्यात येईल असे बैठकीत करण्यात येईल असे सांगितले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy