काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अशोक कांबळे यांची निवड !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
               येथील नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सर्वोदय छात्रालयाचे संचालक अशोक चांदरावजी कांबळे यांची नूकतेच काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केल्याचे नियुक्ती पत्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले आहे..
               अशोकराव कांबळे हे कुंडलवाडी नगरपालिकेचे गेल्या तिन टर्म पासून प्रतिनिधित्व करतात.ते एकदा कुंडलवाडी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पद ही भूषविले होते.ते येथील माजी नगराध्यक्ष कै.के.रामलू यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू नगरसेवक होते.ते कुंडलवाडीत आज पर्यंत कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करीत आलेले आहेत. पक्षातील त्यांच्या कामाची दखल घेऊन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नूकतेच नांदेड येथे त्यांना एका कार्यक्रमात बोलावून त्यांची नांदेड जिल्ह्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.याप्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,माजी मंत्री डी.पी.सावंत,आ.अमर राजूरकर,आ.ओमप्रकाश पोकरणा,जिल्हा अध्यक्ष नागेलीकर,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष डाॅ. गंगाधर सोनकांबळे सह आदी मान्यवर उपस्थित होते.
अशोकराव कांबळे यांच्या नियुक्ती बदल माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर,आ.जितेश अंतापूरकर,शिवाजी पाटील पाचपिंपळीकर,माजी नगराध्यक्ष डाॅ. एस.एस.शेंगुलवार, माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार,राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड,साईनाथ उतरवार,राजेश्वर उतरवार,पत्रकार राजेंद्र कांबळे,सुभाष दरबस्तेवार, कुंडलवाडी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे अमरनाथ कांबळे,जयवर्धन भोसीकर,सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन.जी.देवकरे,शेख मैनोदीन मगदूमसाब अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या