कंधारात जागर संविधानाचा या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

[कंधार : दि. 19 ता.प्र.]
भारतीय संविधान गौरव दिन व भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघाच्या वतीने ” जागर संविधानाचा ” या प्रबोधनात्मक गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय संविधान गौरव दिन व भिमा कोरेगाव शौर्य दिना निमित्त कंधार शहरात सुप्रसिद्ध गायक,झी युवा संगीत सम्राट फेम अजय देहाडे यांच्या भारदार आवाजात काळजावर कोरल नाव आमच्या,भीमा कोरेगाव,बुद्ध भीमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शनिवार दि.24 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे,राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, गोविंद दळवी, राज्य प्रवक्ता फारूख अहेमद, जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, जिल्हा महासचिव श्याम कांबळे,महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड,उपाध्यक्ष जालिंदर कागणे,प्रशांत इंगोले,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दैवशाला पांचाळ,महासचिव सुनंदाताई भोसीकर,कंधार नगरीचे माजी नगराध्यक्ष दगडुभाऊ सोनकांबळे,लोहा नगर परिषदेचे नगरसेवक पंचशील कांबळे, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष गंगाधर कांबळे,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.एम.वाघमारे,तालुकाध्यक्ष विलास कांबळे,सचिव नामदेव कांबळे,समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा जागर संविधानाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 
या कार्यक्रमास कंधार -लोहा शहरासह तालुक्यातील बंधू-भगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे कंधार तालुकाध्यक्ष संतोष पाटील गवारे,खंडूजी अकोले,सतिश आनेराव,बबन जोंधळे,भास्कर कदम,विहान पा.कदम,मोसिन बागवान,प्रेमानंद गायकवाड,सुमित पवार,मनोज जमदाडे,प्रविण कछवा,अहमद पठाण,चंद्रशेखर गायकवाड,नितीन सुर्य,सदानंद धुतमल यांनी केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या