जनता हायस्कूल येथील पटांगणावर संविधान दिन साजरा

(नायगाव बा.तालुका प्रतिनिधी-गजानन चौधरी)
संविधान दिनानिमित्ताने जनता हायस्कूल च्या वतीने पटांगणावर प्रथम प्रतिज्ञा व राष्ट्रगीतानंतर २६/११/२००८ च्या मुंबई वरील अतिरेकी हल्ल्यात बळी पडलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांनंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
त्यांनंतर दयानंद महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य श्री जी.एल. हिंगोले यांचे भारतीय संविधानावर सखोल व विविधतेतील एकता समता, स्वातंत्र्य व बंधुभाव जोपासणारी भारतीय राज्य घटना म्हणजे जगातील एक आश्चर्य आहे तसेच राज्य घटना हा एक राष्ट्रग्रंथ आहे आणि तो प्रत्येकाच्या घरी असवा , असे सांगितले.
याप्रसंगी शाळेतील असंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक- शिक्षिका, मुख्याध्यापक श्री केशवराव सुर्यवंशी, उपमुख्याध्यापक श्री सा.रा. जाधव, गटशिक्षणाधिकारी श्री मोहनराव कदम व सेवानिवृत्त शिक्षक भाऊराव मोरे हे उपस्थित होते.

Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या