१५ ऑगस्ट एवढेच २६ नोव्हेंबर ला महत्त्व आहे; या संविधानामुळेच स्वातंत्र्य मिळाले – तहसिलदार श्रीकांत निळे.

[ बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे ]
भारतीय संविधान जाजृती महोत्सव या कार्यक्रमात १५ ऑगस्ट एवढेच २६ नोव्हेंबर ला महत्त्व आहे, या संविधानामुळेच स्वातंत्र्य मिळाले असे प्रतिपादन तहसिलदार श्रीकांत निळे यांनी बिलोलीत आयोजित कार्यक्रमात केले.

बिलोलीत भारतीय संविधान दिनानिमित्य संविधान दिंडी रॕलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह सामाजिक कार्यकर्ते, नवयुवक मोठ्या संखेने सहभाागी झाले होते.
बिलोली शहरात “संविधान जागृती समिती बिलोली च्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या भारतीय संविधान जाजृती महोत्सव, संविधान दिंडीत पुज्य सानेगुरुजी हायस्कूल, लिटल फ्लाव्हर काॕनवेंट स्कूल बिलोली चे विद्यार्थी, कार्यकर्ते, नवयुवकांनी छञपती शिवाजी महाराज, डाॕ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार टाकून अभिवादन केले.
या सदरिल कार्यक्रमात बिलोलीचे तहसिलदार मा.श्रीकांत निंळे, धुळे जिल्हा न्यायाधीश मा. महम्मद रियाजोद्दीन, मा.कांऊसलर, बाल न्यायालय नांदेडच्या डाॕ.सुप्रिया गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाळेचे मुख्याद्यापक, शिक्षक , शिक्षिका, विद्यार्थी, पञकार,कार्यकर्ते,नागरिक,नवयुवकांची मोठी उपस्थिती होती. भारतीय संविधान संविधान दिंडी समारोप समारंभ यशस्वी पार पाडण्यासाठी संविधान जागृती समितीचे पदाधिकारी श्री.कमलाकर जमदाडे, गौतम भालेराव, मोहण जाधव, संदिप कटारे यांच्यासह अनेक जनांनी परिश्रम घेतले.
सदरिल कार्यक्रमाचे समारोप राष्ट्रीय गिताने करुन आलेल्या मान्यवर व कार्यकर्ते, विद्यार्थी, नयुवकांचे अभार कमलाकर जमदाडे यांनी मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या