भारतीय संविधान जपले पाहिजे – शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
उमरी – उपेक्षित समाजाच्या न्याय हक्कासाठी डाँ.बाबासाहेब आंबडकरांनी प्रतिकुल परिस्थितीत उच्च विभूषित शिक्षण घेवून अनेक पदव्या मिळविल्या. बहुजन समाजाला बोलत करण्यासाठी बहिष्कृत भारत वृत्रपत्र काढून अन्याय अत्याचारा विरुध्द आवाज उठविला. पुढे ते घटना समीतीचे अध्यक्ष झाले. त्यांनी जगातील अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास करून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताला लोकयुक्त संविधान दिले. गरीब आणि श्रीमंतला एकच मताचा अधिकार दिला. त्या मतदानाचा वापर योग्य व्यक्तीसाठी झाला पाहिजे. आज संविधानावर देश चालतो त्यामुळे सर्व समाजानी भारतीय संविधान जपले पाहिजे असे आवाहन शेतकरी नेते तथा वाघलवाडा साखर कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी केले.
दि.२२ जानेवारी रोजी उमरी शहरातील काश्यप बुद्ध विहार येथे ७१ वा संविधान गौरवदिन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते.
उद्घाटक म्हणून आ.मोहन अण्णा हंबर्डे, कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी, स्वागतअध्यक्ष नगरसेवक ईश्वर सवई, प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य शिंदे, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, सुधाकरराव देशमुख, सीईओ संदीप पाटील कवळे, सिंधीचे सरपंच प्रभाकर पाटील पुयड, बापुराव पाटील करकाळेकर, जी.पी.मिसाळे, गंगाधर धडेकर, सुदर्शन वाघमारे, कांबळे, जोंधळे, मलीकार्जुन चंदापुरे हे होते.
प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर, श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आ.मोहन अण्णा हंबर्डे, शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी व मान्यवरांनी पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली.
या प्रसंगी भारतीय संविधान प्रस्थाविकेची शपथ ग्रहण केली.
या प्रसंगी आ.मोहन हंबर्डे, संजय कुलकर्णी, सुधाकरराव देशमुख, जी.पी.मिसाळे, बा.स.पठाडे, कु.अनुश्री मदनवाड यांनी भारतीय संविधान विषयी विचार मांडले.
कार्यक्रमाचे आयोजक सोनु वाघमारे (नगरसेवक प्र. न. पा. उमरी) हे सर्व समाज बांधवांना एकत्रित करून प्रत्येक वर्षी अशी कार्यक्रमे घेतात. त्यांची तळमळ खूप असते. सोनुच्या हातून अशी सामाजिक कार्यक्रम प्रत्येक वेळेस घडो अशा शुभेच्छा माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी दिल्या.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. मारोती मल्लीकार्जुन चंदापुरे- उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी ग्रा. रु. उमरी, मोहन बाळासाहेब भोसले – कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक, माधव बोथीकर – तहसीलदार उत्कृष्ट प्रशासक, पांडुरंग खंडोजी सोनकांबळे – उत्कृष्ट पत्रकार, सुधाकर दत्तराम देशमुख धानोरकर-  उत्कृष्ट ग्रामपंचायत पॅनल प्रमुख, विजय पंढरीनाथ उत्तरावर- प्रसिद्ध व्यापारी, सुमित दत्तहारी धोत्रे (ips), माधव जळबाजी शिंदे – औषध निर्माता अधिकारी, नांदेड कोरोना योद्धा, नागोराव भुजंगा जोंधळे – जीवनगौरव, दत्तात्रय गंगाधर तुपसाखरे – समाज भूषण, सौ. राजश्री मल्लिकार्जुन हिमगिरे (विभुते)- कवियत्री, बाजीराव पठाडे – साहित्यिक, गंगाधर केरबा पवार – उत्कृष्ट न पा कर्मचारी उमरी, बालाजी माधवराव ढगे- कृषीरत्न, सौ सुरेखा गोपीनाथ कठाले (सर्जे), सौ.पंचशीला नागोराव जोंधळे (कदम) आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप गोवंदे, राजेश सवई, गजानन आडगुडवार, बालाजी सुर्यवंशी, प्रसाद जोंधळे, राजू सरोदे यांसह अनेकांनी परिश्रम घेतले. सायंकाळी गायक संविधान मनोहरे अमरावती, गायीका सीमा खंडागळे परभणी यांचा बुद्ध, फुले,गितांचा मुकाबला झाला. प्रास्ताविक सोनू वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन कैलास धुतराज यांनी केले तर आभार महेंद्र कांबळे यांनी मांडले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या