उमरीत ७१ वा संविधान दिन डॉ आंबेडकर नगर येथे साजरा

( नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी )

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताला संविधान सुपूर्द केले. त्याच दिनाचे औचित्य साधून आज डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य कैलास सोनकांबळे यांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर मदने ( सेवानिवृत न पा कर्मचारी ) हे होथे तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व संविधान वाचन आकाश खदारे यांनी केले व क्रार्यक्रमाचे पुजापाठ लक्ष्मण डुबने यांनी केले या कार्यक्रमाची प्रस्तावना मध्ये बोलतांना पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य कैलास सोनेकांबळे असे म्हणाले की या देशामध्ये अनेक वर्षापासून गुलामगीरी लादली असताना इतल्या संबध लोकांना गुलामगीरीच्या बेड्यातून मुक्त करून स्वातंत्र भारताला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले या क्रार्यक्रमाला उपस्थित प्रभाकर नामवाड सर,गौतम लांडगे, अजित सोनकांबळे,राजरत्न खंदारे, रवि सोनेकांबळे, रविराज सवई, सिद्धार्थ वाघमारे, संदिप सवई, तरून वाघमारे, मनोज लाडके, कपिल सवई, मनोज सोनकोबळे, दिपक सवईअजय गायकवाड सिद्धार्थ वाघमारे मारोती शेळके व गर्जना युवा मंच चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

ताज्या बातम्या