कुंडलवाडीचे ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण ; लोकार्पणाच्या प्रतीक्षेत ; ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची नागरिकांची मागणी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
         येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील भार कमी करण्यासाठी गेल्या सहा वर्षांपूर्वी शहरात 50 खाटाचे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले होते, मंजूर झालेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम आज तागायत पूर्ण झाले असून ते गेल्या सहा महिन्यापासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने तात्काळ ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण करून रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करावे अशी मागणी येथील नागरिक करीत आहे.
           कुंडलवाडी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाच उपकेंद्रासह 24 गावांचा समावेश होतो.याव्यतिरिक्त पंधरा हजाराच्या वर लोकसंख्या असलेल्या कुंडलवाडी शहराचाही अतिरिक्त भार मोठ्या प्रमाणात या प्राथमिक आरोग्य केंद्रावर पडत असल्यामुळे रुग्णांची सोयी सुविधा अभावी हेळसांड होत होती. तत्कालीन माजी आमदार सुभाष साबणे यांच्या पुढाकारातून कुंडलवाडी शहराला 50 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले.
मंजूर झालेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी दहा कोटी रुपये खर्च करून अत्यंत संथ गतीने का असेना आजतागायत इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून गेल्या सहा महिन्यापासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रावरील रुग्णांचा भार कमी करून सर्व सोयीयुक्त ग्रामीण रुग्णालय शहरात सुरू करावे अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या