बिलोली येथील तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा.

[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
बिलोली येथे तहसील कार्यालयात ग्राहक पंचायत आणि तहसीलच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक दिन साजरा करण्यात आला.यावेळी हुतात्मा गोविंदराव पानसरे महाविद्यालयाचे डॉ. गोपाळ चौधरी आणि राजेश लाभसेटवार यांनी मार्गदर्शन केले.
ग्राहक हा राजा आहे. ग्राहकांनी आपले हित जोपासावे. ग्राहक देवो भव असे ग्राहक पंचायतीचे सूत्र आहे. बाजारातून एखादी वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी सजग राहने आवश्यक आहे.काहीही खरेदी करत असताना त्या वस्तुची पुर्ण माहिती ठेऊन त्याची पक्की पावती घेणे गरजेचे आहे.
एखाद्या वेळेस आपण घेतलेली वस्तू अथवा सामान खरेदी करताना आपली फसवणूक झाल्यास आपल्याजवळ सर्व पुरावे असल्यास आपणास ग्राहक संरक्षण कायद्याच्या आधारे नुकसान भरपाई मिळविण्यास मदत होईल. अशी माहिती नांदेड जिल्हा ग्राहक पंचायतीचे बिलोली तालुका अध्यक्ष प्रा. गोपाळ चौधरी यांनी दिली.
दि. ११ जानेवारी रोजी बिलोली तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात गोपाळ चौधरी यांनी प्रभावी माहिती दिली. ग्राहकांचे हक्क व ग्राहक संरक्षण कायदा याबाबत जनसामान्यापर्यंत जनजागृती होण्याच्या उद्देशाने बिलोली तहसिल कार्यालयात दि.११ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. अशा कार्यक्रमास व्यापक पद्धतीने साजरा करण्याची गरज असल्याचे लक्षात घेता व्यापक कार्यक्रमाची निवडता आणि नियोजन याबाबत जिल्हा पातळीवर चर्चा करण्यात आली.
बिलोली येथील ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात श्री राजेश्वर लाभसेटवर आणि गोपाळराव चौधरी यांचे विशेष मार्गदर्शन झाले.या वेळी अतिथी म्हणून नायब तहसीलदार आर. जी चव्हाण,देगलुर ता. अध्यक्ष सुभाष देगलूरकर,संघटक ईंद्रजीत तुडमे,बिलोली तालुका ग्राहक पंचायतचे कोषाध्यक्ष बसवंत मुंडकर,संघटक मोहसिन खान, साईनाथ आरगुलवार, साईनाथ शिरोळे, सय्यद रियाज यांची उपस्थिती होती.सुञसंचलन लिपिक पाटील यांनी केले.
तर प्रस्ताविक व आभार गंगाराम पाटील यांनी मानले.सदरिल कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ना.तहसिलदार आर.जी.चौहाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाचे पाटील, चव्हाण, जाकीर यांच्या सह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.यावेळी बिलोली तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व नागरिक उपस्थित होते. मुख्य मार्गदर्शक तथा ज्येष्ठ पत्रकार श्री गोविंद मुंडकर, आणि उपजिल्हाधिकारी श्री सचिन गिरी , तहसीलदार श्रीकांत निळे यांची अन्य कार्यक्रमामुळे अनुपस्थिती असल्याचे सांगण्यात आले. ग्राहकांच्या प्रबोधनासाठी महसूल विभागाच्या आणि ग्राहक पंचायतच्यावतीने व्यापक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या