कलाकार, कंत्राटी कामगारानंतर गरीब गरजूंना अरविंदो मीरा संस्थे मार्फत धान्य वाटप !

(नवी मुंबई, दि. ७ – अरूणकुमार सुर्यवंशी)
सुप्रसिद्ध अभिनेत्री नयन पवार यांनी पुढाकार घेऊन अरविंदो मीरा संस्थेच्यावतीने विष्णूदास भावे सभागृह वाशी येथे सर्व स्तरातील गरजूंना धान्य वाटप केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी पहिले लॉकडाऊन करण्यात आले. शासनाने कडक निर्बंध लावले.रोजगार बंद पडले. लोकांची उपासमार होऊ लागली. उत्पन्नाचे सगळे मार्ग बंद झाले. त्यातच कोरोनाची दुसरी लाट आली. पुन्हा लॉकडाऊन. यात सर्व थरातल्या लोकांचे खूप हाल झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने ते बेरोजगार झाले. त्यामुळे लोकांचे खाण्यापिण्याचे हाल झाले. कोरोनामुळे एकाच कुटुंबात अनेक सदस्यांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अश्या परिस्थिती मध्ये अनेकांनी मदतीसाठी याचना केली. परिस्थिती लक्षात घेता अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी धावून आल्या. त्यापैकीच एक संस्था म्हणजे अरविंदो मीरा ही आहे.

गेल्या काही दिवसांपासून अरविंदो मीरा संस्थेच्यावतीने गोरगरीब, गरजू, रस्त्यावर काम काम करणारे कामगार, कंत्राटी कर्मचारी तसेच नाट्य क्षेत्रात काम करणारे कलाकार यांना अरविंदो मीरा संस्थेच्यावतीने धान्य वाटप करण्यात आले. नवी मुंबईतील नेरूळ, मुंबईत दादर टीटी, शिवाजी मंदिर नाट्यगृह व आता वाशी येथील विष्णुदास भावे या ठिकाणी सर्व स्थरातील लोकांना धान्य वाटप करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून अरविंदो मिरा या संस्थेमार्फत ही मदत करण्यात येत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री नयन पवार यांच्यावतीने हे धान्य वाटप केले जात आहे.
वाशी येथे धान्य वाटप करताना अरविंदो मीरा संस्थेच्या सचिव मानसी राऊत ,खजिनदार धनश्री साखरकर, समाजसेवक रत्नाकर खानविलकर यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या