कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे !

(रायगड/म्हसळा ता.प्रतिनिधी-प्रा.अंगद कांबळे)

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे.

रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेन, रोहा, खालापूर, अलिबाग या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनाना सुरुवात केली आहे.

जिल्ह्यातजमावबंदी पुन्हा एकदा लागू करण्यात आली आहे. कोरोना विषयक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणाना यासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देशन दिलेत.

सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बाजारपेठेत गर्दी होणार नाही याची दक्षता बाळगणे याची सूचना महानगर पालिका, नगरपंचायत, हॉटेल व्यावसायिकांना यांना देण्यांत आली आहे. जर उल्लंघन झालेले दिसून आले तर कारवाईचे निर्देश जारी कारण्यात आले आहेत.

या शिवाय लग्नसमारंभावर आत्ता प्रशासनची करडी नजर असणार आहे. 50 पेक्षा अधिक व्यक्तींना सहभाग घेता येणार नाही. उल्लंघन झाले तर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यांत आले आहेत.

ताज्या बातम्या