कुंडलवाडीत सापडले तीन कोरोना बाधित रुग्ण !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेल्या कुंडलवाडी शहरात तीन कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहून जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद माहुरे यांनी केले आहे.
 देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉन या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे, याच अनुषंगाने कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत शहरात दिनांक 4 जानेवारी रोजी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व दिनांक 8 जानेवारी रोजी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असे एकूण तीन रुग्ण आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
असे असले तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहून मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर ठेवून जास्तीत जास्त कोविड लसीकरण करून घ्यावे, व ज्या नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत अशा व्यक्तींनी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड चाचणी करून घ्यावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोद माहुरे यांनी केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या