संचारबंदी नियम पाळून प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदीच्या नियमाचे कठोरपणे पालन करा !-जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर

• नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 165 व्यक्ती कोरोना बाधित
• सहा जणांचा मृत्यू
नांदेड (जिमाका) दि. 23 :-
जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व पातळीवर प्रयत्नांची शर्त केली जात असून जनतेनेही तेवढ्याच जबाबदारीने जिल्हा जाहीर केलेल्या संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. हा लढा सर्वांच्या मुक्तीचा असून सर्वांनी एकत्रीत आपले कर्तव्य व काळजी घेतली तर जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाला आपण यशस्वीपणे नियंत्रणात आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात दिनांक 24 मार्च रोजी 1 हजार 165 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 4 हजार 924 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 608 तर अँटिजेन तपासणीद्वारे 557 अहवाल बाधित आहेत. आजचे 1 हजार 165 बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 35 हजार 502 एवढी झाली आहे.

सोमवार 22 मार्च रोजी साईनगर नांदेड येथील 70 वर्षाच्या एका महिलेचा, हदगाव येथील 64 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर मंगळवार 23 मार्च रोजी मुखेड तालुक्यातील चावणवाडी येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा, साईबाबा मंदिर रोड नांदेड येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर बुधवार 24 मार्च रोजी अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील 45 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर माहूर येथील 71 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 674 एवढी झाली आहे.

आजच्या 4 हजार 924 अहवालापैकी 3 हजार 642 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 35 हजार 502 एवढी झाली असून यातील 26 हजार 779 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 7 हजार 816 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 62 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 23, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 392, धर्माबाद तालुक्यांतर्गत 5, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 3, किनवट कोविड रुग्णालय 3, मुखेड कोविड रुग्णालय 16, हदगाव कोविड रुग्णालय 4, देगलूर कोविड रुग्णालय 5, बिलोली तालुक्यांतर्गत 3, खाजगी रुग्णालय 32 असे एकूण 486 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.42 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 432, नायगाव तालुक्यात 25, भोकर 13, उमरी 2, तेलंगणा 1, नांदेड ग्रामीण 12, हदगाव 13, बिलोली 13, परभणी 3, लोहा 30, धर्माबाद 19, हिमायतनगर 10, यवतमाळ 4 असे एकूण 608 बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 294, बिलोली तालुक्यात 20, कंधार 10, मुखेड 26, मुदखेड 1, नांदेड ग्रामीण 28, देगलूर 4, किनवट 29, नायगाव 7, परभणी 5, अर्धापूर 27, धर्माबाद 15, लोहा 23, उमरी 3, यवतमाळ 1 असे एकूण 557 बाधित आढळले.

जिल्ह्यात 7 हजार 816 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 234, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 80, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 91, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 64, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 107, मुखेड कोविड रुग्णालय 152, देगलूर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 57, बिलोली कोविड केअर सेंटर 111, नायगाव कोविड केअर सेंटर 32, उमरी कोविड केअर सेंटर 12, माहूर कोविड केअर सेंटर 41, भोकर कोविड केअर सेंटर 2, हदगाव कोविड रुग्णालय 76, लोहा कोविड रुग्णालय 149, कंधार कोविड केअर सेंटर 24, महसूल कोविड केअर सेंटर 125, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 3, धर्माबाद कोविड केअर सेंटर 45, मुदखेड कोविड केअर सेंटर 18, अर्धापूर कोविड केअर सेंटर 30, बारड कोविड केअर सेंटर 8, मांडवी कोविड केअर सेंटर 3, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 971, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 945, खाजगी रुग्णालय 435, लातूर येथे संदर्भीत 1 आहेत.

बुधवार 24 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 9, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20 एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 85 हजार 53
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 43 हजार 649
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 35 हजार 502
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 26 हजार 779
एकुण मृत्यू संख्या-674
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.42 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-29
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-68
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-410
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-7 हजार 816
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-62.

शासकीय रुग्णालयातील संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील डॉ. अंकुशे कुलदिपक मो. 9850978036, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील डॉ. खान निसार अली मो. 9325607099, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड डॉ. वाय. एच. चव्हाण 9970054434 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या