कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयानक आहे.लोहा शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस त्याचा प्रकोप वाढतच आहे.लोहा तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना तपासणी व उपचार चालू करावेत.त्यामुळे खेड्यापाड्यातील नागरीकांना वेळेवर उपचार भेटतील आणि कोरोनाची लागण कमी होईल असे मत शिवसेनेचे युवा नेते,लोहा पं.स.चे सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नवनाथ उर्फ बापू रोहिदास चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
नांदेड जिल्ह्यात कोविड-19 आजारांच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे.त्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने शहरासह तालुका जिल्हाभरात, लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या संख्येत सातत्याने अधिक वाढ होतच आहे.तालुक्यात शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब सामान्यांची संख्या जास्त आहे.कोरोनाचे प्रमाण जास्त पसरले आहे.सद्यस्थितीत तर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात कोरोना पसरला आहे.सामान्य माणसाला तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी, तपासणी करण्यासाठी जावे लागत आहे.
वेळेवर उपचार मिळत नाही.तालुक्याच्या ठिकाणापर्यंत वेळेवर माणुस पोहोचू शकत नाही.त्यात बराच अवधी जात आहे.खाजगी दवाखान्यात तर रूग्ण सेवेच्या नावाखाली अमाप लुट चालू आहे.त्यावर जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर हे छापा,धाडसत्र मोहीम हाती घेऊन कठोर पाऊले उचलले जात आहे.राज्यातील परिस्थितीचाही आढावा वेळोवेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब घेऊन अतिशय योग्य पद्धतीने वाखाणण्याजोगे काम करत आहेत.कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयानक आहे.लोहा तालूक्यात महसूल, आरोग्य, पोलीस विभागाने लोकांच्या मागणीनुसार न.पा.प्रशासनाने जनता कर्फ्यु चे आयोजन केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना साखळी तोडण्यासाठी सलग 11दिवसाचा दि.24 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत लौकडाऊन लावण्यात आला.अनेक वेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लोहा कंधारचे माजी आमदार रोहिदासजी चव्हाण यांनी देखील माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणुन जनतेला जनतेने घ्यावयाच्या खबरदारी विषयी वेळोवेळी आवाहनही केले.गत वर्षभरात कोरोना कालावधीत नवनाथ उर्फ बापु चव्हाण स्वत: अनेक उपक्रम राबविले.
मास्क,सैनिटायझर,सोशलडिस्टन्स या त्रिसुत्रीच्या माध्यमातून लोकजागृती ही केली.सद्यस्थितीची परिस्थिती लक्षात घेता लोहा तालुक्यातील रूग्ण संख्याही अतिशय वेगाने वाढत आहे.मृत्यूचे प्रमाणही जास्त दीसत असून एका पाठोपाठ एक असे अनेक मोहरे दिवसागणीक जात आहेत.
यावर जर आवर आणायची असेल तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना तपासणी करून उपचार चालु करावेत.जेणेकरून त्यामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांना लवकर वेळेत उपचार भेटतील आणि लागण कमी होईल असे मत शिवसेनेचे युवा नेते,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा लोहा पंचायत समितीचे सदस्य नवनाथ ऊर्फ बापु रोहिदास चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy