कोरोणाच्या काळात उमरी तालुक्यातील गरजूंसाठी एक पाऊल मदतीसाठी म्हणून सतत एक महिन्यापासून अमोल पाटिल ढगे यांच्या माध्यमातूम 4700 धान्य किटचे वाटप व 763 रक्तदात्यांनी 26 गावानमध्ये रक्तदान केले व तसेच 1800 कोविड औषध किटचे उमरी तालुक्यात वाटप त्यांचा समारंभ सोहळा नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन पंचायत समितीचे सभापती शिरीषभाऊ गोरठेकर साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्रावण भिलवडे, बालाजी बच्चेवार, शिवराज पाटील होटाळकर, लक्ष्मण ठक्करवाड, ता.अध्यक्ष गणेश पाटील गाढे, शहरध्यक्ष विष्णु पंडित, गजानन श्रीरामवार, बालाजी जाधव, बालाजी पा.ढगे, आनंदराव यल्लमगोडे, डाॅ.विक्रम देशमुख, महिला जि. सरचिटणीस प्रेमलता आग्रवाल, ता.म.अध्यक्ष प्रणिताताई जोशी, सुनिताताई पोपटेलवार, राणी पोटेवाड या कार्यक्रमास बोलतेवेळेस नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार असे म्हणाले की भारतीय जनता पार्टी कोरोणाच्या काळात एक पाऊल मदतीसाठी म्हणून अन्नधान्य वाटप करीत आहे असाच एक स्तुत्य उपक्रम म्हणून उमरी तालुक्यात चार हजार सातसे किट व 1800 कोविड किट चे वाटप झाले आणि रक्तदात्यांनी 763 जणांनी रक्तदान केले खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अमोल ढगे खूप छान कार्य केल्या बदल पाठीवर थाप मारून शुभेच्छा दिल्या.. तसेच उमरी पंचायत समितीचे सभापती, युवा नेते शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर यांनी पण अमोल तुझ्या कार्याला सलाम असे म्हणाले. यावेळी बोलताना म्हणाले उमरी ता. अध्यक्ष गणेश पाटील गाडे यांनी पण शुभेच्छा दिल्या.. डॉ.अमोल पाटील ढगे म्हणाले मी समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतुने हा उपक्रम चालु केलो अशीच मदत करत राहणार भारतीय जनता पार्टी अशा संकट काळामध्ये गोरगरिबांची सेवा करणार असे अमोल पाटील ढगे यांनी म्हणाले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy