रायगड जिल्हयात कोरोना लसीकरणाला पालक मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

शल्यचिकिस्तक डॉ.सुहास माने यांना लस टोचून केली लसीकरणाची सुरूवात!

(रायगड /म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे)

देशव्यापी कोरोना लसीकरण मोहीम केंद्र व राज्य शासन यांच्या सुचने प्रमाणे रायगड जिल्ह्यातील शासकीय ज़िल्हा रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरणाचा शुभारंभ पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थित झाला.

गेली अनेक दिवसापासून लसीची प्रतीक्षा एकदा संपली. या प्रथमत: चार टप्यात आरोग्य कर्मचार्याना कोविड लस दिली जाणार आहे.जिल्ह्यत जवळ जवळ नऊ हजार पाचशे लस प्राप्त होणार आहेत तर २८ दिवसा नंतर डोस घेतलेल्या व्यक्तीला दुसरा डोस देण्यांत येणार आहे.

राज्याला कोविडशील्ड व्हॅक्सीन चे ९ लाख ६३ हजार डोसेस व लसी चे २० हजार डोस प्राप्त झाले आहेत.या वेळी ज़िल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी आमदार महेंद्र दळवी,नगरध्यक्ष नाईक,ज़िल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक दुधे साहेब जिल्हा कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मोरे रुग्णालयातील इतर वैदयकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते..

ताज्या बातम्या