कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धर्माबाद न.पा.व पोलिस प्रशासन सज्ज !

(धर्माबाद ता.प्रतिनिधी-नारायण सोनटक्के)
नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी (ता.१२) मार्च ते २१ मार्च पर्यंत सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याचे व इतर निर्बंध लागू केले आहेत.
सदरील निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी डॉ.राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार दत्तात्रय शिंदे, पोलिस निरीक्षक सोहन माछरे व नगरपालिका कर्मचारी यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून फिरत नागरिकांना व व्यापाऱ्यांना कोरोनाचे अटी व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या नागरिकांना व शहरातील अनेक व्यापाऱ्यांना विनामास्क फिरत असल्यामुळे त्यांच्यावर पालिकेचे कर्मचारी दंडात्मक कारवाई केली आहे. व नागरिक, व्यापारी, कामगार, फळविक्रेते व भाजीपाला विक्री करणाऱ्या लोकांना चेहऱ्यावर मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
यावेळी तहसिलदार दत्तात्रय शिंदे, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक मोहनराव तुंगीनवार, बाबूराव केंद्रे, रूक्माजी भोगावार, सफाई विभाग प्रमुख अशोक घाटे, सुर्यकांत मोकले, किशन सोनकांबळे, भीमराव सुर्यवंशी, मनोज टाक, साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक साहेबराव नल्लेवाड, पोलिस नाईक हरीष मांजरमकर ट्राफिक पोलीस कर्मचारी माधव पाटील खतगावकर, शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह पोलिस कर्मचारी व पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. 

ताज्या बातम्या