कुंटूर येथे कापुस खरेदी केंद्र चालु  !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापूस लागवड केली जाते. मात्र यंदा अतिवृष्टी आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट झालेली पाहायला मिळाली. त्याचबरोबर यंदा कापसाचे चालु भाव ८६०० रूपये ने खरीदी केला जाईल असे राजेश गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांनी सांगितले.

न्यु जय अंबिका जिनिंग अँड प्रेंसिंग कापुस खरेदीला सुरूवात झाली आसुन या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब धर्माधिकारी उद्घाटक राजेश गंगाधरराव देशमुख कुंटूरकर, प्रमुख पाहुणे रूपेश गंगाधरराव देशमुख,पवार साहेब ए आर नायगाव यांची उपस्थिती होती व या परीसरातील सुर्याजी पा चाडकर संरपच चारवाडी, सरपंच प्रतिनिधी मारोतराव कदम, गजानन पा जुन्ने, प्रभतराव पा जाधव, व्यंकट पाटील मोरे, बाबुराव पा आडकीने, लक्ष्मण पा आडकीने, बालाजी व्यकोजी पा जाधव, श्रीनिवास पा कदम, बालाजी पवार कुंटूर तांडा, मारोतराव पा सांगवे, मुलतान शेठ गुजिवाले, बाबुराव देशमुख कोकलेगाव, देविदास देशमुख, तानाजी रावसाहेब देशमुख, बालाजी पाटील होळकर, गणेश स्वामी, बालाजी पा लव्हळे संरपच सालेगाव, माधवराव पा भोसले, शंकरराव पा शिंदे, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी व्यकंटराव पा कदम, व शंकर पाटील कदम, न्यु. जय अंबिका जिनिंग याचे मॅनेजर महेबूब शेख मा मोरे ए जी प्रा. सचिव शंकर आडकीने, बालाजी हनमंते पत्रकार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडे सर यांनी केले.

Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या