सर्व कोविड सेंटर व कोविड हॉस्पिटल मध्ये सीसीटीवी कैमरे बसवून त्याचा डिस्प्ले हॉस्पिटलच्या बाहेर लावा – तुकाराम दाढेल

( विशेष प्रतिनिधी / रियाज पठान )
लोहा,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ ही संघटना नेहमीच जनहिताचे जन उपयोगी कार्य करत असते. असेच जनहित व जन मनातील भावनांचा विचार करून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सुभाश बसवेकर, कार्याध्यक्ष श्री.चंद्रभान डी. कोलते व जिल्हा अध्यक्ष श्री.संतोष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.३०/०४/२०२१ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ लोहा,तालुका अध्यक्ष तुकाराम का. दाढेल यांच्या वतीने मा.जिल्हाधिकारी नांदेड,मा.पालकमंत्री नांदेड जिल्हा,मा.गृहमंत्री महाराष्ट्र शासन,मा.आरोग्य मंत्री महाराष्ट्र शासन, मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन,मा.तहसिलदार लोहा,वैधकीय अधिक्षक लोहा, मुख्याधिकारी न.पा. लोहा,पोलीस स्टेशन लोहा यांना ईमेल द्वारे नीवेदन देण्यात आले. ज्या मध्ये कोविड सेंटर व कोविड हॉस्पिटल मध्ये सीसीटीवी कैमरे बसवण्यात यावेत व त्याचा डिस्प्ले हॉस्पिटलच्या बाहेर लावणे विषयी निवेदन सादर करण्यात आले.
सध्या संपूर्ण जगात कोरोना या संसर्गजन्य जागतिक महामारीने थैमान घातले आहे, यातच भारत देशातील प्रत्येक राज्यात व जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांची संख्या लाखांवर पोहचली असून मृतांची संख्या ही हजारोंच्या आकड्यात आहे.महाराष्ट्र सह सर्विकड़े परिस्थिति बिकट झालेली आहे. अस्याच परिस्थितिमध्ये वाट्सअप आणि फेसबुक सारख्या सामाजिक माध्यमात प्रसारित होणाऱ्या मृत्यु विषयी अफवा, हॉस्पिटल मध्ये बेड्स व ऑक्सीजनचा तुटवडा,औषधाची कमतरता व या सर्वामुळे होणारे मृत्यु हे सर्व बघून पीड़ित व्यक्ति व त्याचे कुटुंबिय पूर्णता हताश झालेले आहेत.त्यांचा डॉक्टर व हॉस्पिटल वरचा आता विस्वास कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे विपरीत परिणाम म्हणून अनेक हॉस्पिटल मध्ये मृतकच्या नातेवाईकाद्वारे तोड़फोड़ व स्टाफ सोबत मारपीटच्या घटना वारंवार घडत आहेत.
अश्याने संपूर्ण देशात सामाजिक अराजकता पसरून शासन व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उद्भवण्याची शंका मुळीच नाकारता येत नाही.हॉस्पिटलचे लाखो रूपयांचे अफाट बिल भरून सुद्धा कुटुंबाच्या सदस्यचा मृत्यु ची बातमी एकायला मिळत आहे. कोरोनाग्रस्त मृतक व्यक्तिची डेडबॉडी ( शव ) संसर्गची दक्षता म्हणून कुटुंबिया सोपविली जात नाही, अंतिम संस्कार मध्ये शामिल होता येत नाही,हॉस्पिटल मध्ये उपचार बरोबर होतं आहे की नाही,याची शंका निर्माण होवून विपरीत घटना घडत आहेत.
आणि यामुळे हॉस्पिटल व कुटुंबियामध्ये पारदर्शकतेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी आपनांस विनंती आहे की आपन खालील मागण्या पूर्ण करून पीडित जनतेला न्याय द्यावा..
◾️ शासकीय व खाजगी सर्वच कोविड सेंटर व कोविड हॉस्पिटलच्या प्रत्येक वार्ड मध्ये CCTV कैमरे बसवण्यात यावेत व त्यांचा डिसलेला त्या सेंटर आणि हॉस्पिटलच्या बाहेर लावण्यात यावेत. ज्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांना आपल्या पेशंटवर काय व कशे उपचार होतं आहे, तसेच दगावलेल्या रुग्णाचा मृत्यु कसा व कधी झाला,याची इतंभूत माहिती ही हॉस्पिटलच्या बाहेर बसलेल्या त्यांच्या कुटुंबियाना सहज दिसली पाहिजे.आणि हा त्यांचा संवैधानिक मानवाधिकारच आहे.
◾️ कुटुंबियाना उपचार व मृत्यु बद्दल काही शंका असल्यास किंवा तक्रार व दावा करनेसाठी त्या CCTV कैमरेची त्या दिवसाची फुटेज मागणी केल्यास सीडी व डीवीडी मध्ये तात्काळ देण्यात यावी,व यासाठी हॉस्पिटल व्यवस्थापन ने यंत्रणा उभारुन तशी सुविधा करावी. यामुळे हॉस्पिटलची पारदर्शकता किंवा गड़बड़ीचे पुरावे म्हणून समोर येण्यास मदत होईल.
◾️ सोबतच पीपीई किट व अन्य प्रिकॉशन घेवून कुटुंबातील एका व्यक्तीला पेशंटची अधामधात निगरानी व देखरेख करण्याची सूट द्यावी व तशी सेंटर आणि हॉस्पिटल मध्ये व्यवस्था करावी.
◾️ पेशंटला ऍडमिट करतेवेळी अडव्हांस रक्कम मागणाऱ्या व रक्कम शीघ्र न भरल्यास पेशंटचे उपचार थांबवीणाऱ्या हॉस्पिटल व स्टाफ वर त्याच दिवशी दंडात्मक कार्यवाही करावी व प्रकरणनुसार हॉस्पिटल कडून नुकसान भरपाई वसूल करून मृतकच्या पीड़ित कुटुंबाला देण्यात यावी. व त्या हॉस्पिटल प्रशासन व स्टाफ वर फौजदारी गुन्हा दाखल करून त्या हॉस्पिटलला सील लावण्यात यावे. किंवा कोरोना महामारी संपे पर्यंत त्याचा शासकीय हॉस्पिटल म्हणून वापर करण्यात यावा.
◾️ प्रत्येक कोविड सेंटर व कोविड हॉस्पिटलच्या बाहेर दर्शनी भागावर परवानगी असलेल्या व उपलब्ध असलेल्या ऑक्सजिन बेड्स आणि वेंटिलेटर बेड्स ची संख्याचे रोजचे अपडेट दर्शवनारे मोठे फलक लावावे, व त्या फलकावर खोटी माहिती प्रदर्शित करणाऱ्या हॉस्पिटल व सेंटर वर फौजदारी गुन्हा दाखल करने व मान्यता रद्द करण्याची तरतूद करावी.
अश्यावेळी मृतकच्या कुटुंबियामध्ये पत्नी, पति,आई वडील आणि त्यांचे पाल्य अशे निवडक व्यक्तीनाच पीपीई किट व अन्य प्रिकॉशन सहित दहनघाटवर अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होवू द्यावे आणि स्टाफ द्वारे मृतकचा चेहरा उघडून अंतिम दर्शन करून द्यावे,सोबतच काही शंका असल्यास कुटुंबियानी मागणी केल्यावर स्टाफ द्वारे कुटुंबियाच्या मोबाइल वर मृतकच्या पूर्ण शरीराचे लाइव शूटिंग किंवा वीडीओ शूटिंग करून द्यावे कोरोना काळात राज्याची व जिल्ह्याची स्वास्थ्य व्यवस्था पूर्णता हतबल व अव्यवस्थित झालेली जनतेला दिसुनच आली आहे, सोबतच अनेक कोविड सेंटर आणि कोविड हॉस्पिटलची लूटमार व अमानवीयता पाहायला मिळाली आहे. अश्यातच आता त्यांच्या मानवाधिकार व भावनिक बाबीना सुद्धा दाबन्याचा कटकारस्थान शासनाद्वारे करण्यात येत आहे, असा पीडित जनतेचा गैरसमज झालेला आहे. तरी राज्यातील व जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने आपल्या समक्ष मांडलेल्या वरील समस्यारूपी मागण्या मान्य करावे आणि त्याविषयी शासनाद्वारे गाइडलाईन जाहिर करावी, आणि हे करून शासनाने जनते प्रति आपली मानवीयता व पारदर्शकतेचा परिचय द्यावा.आशा मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तालुका अध्यक्ष,लोहा तुकाराम दाढेल यांच्यावतीने प्रशासनातील संबंधित विभाग व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

ताज्या बातम्या