राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोविड लसीकरण शिबीर;154 नागरिकांनी घेतली लस !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष रणजित पाटील हिवराळे व युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 02 मधील नागरिकांसाठी कोविड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते, या शिबिरात प्रभागातील 154 नागरिकांनी लस घेऊन आरोग्य विभागास सहकार्य केले आहे.
त्यामध्ये पहिला डोस 24 नागरिकांनी तर 130 नागरिकांनी दुसरा डोस घेतले आहे.या अगोदरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी कोविड लसीकरण शिबीर घेऊन 205 लोकांना पहिला डोस देण्यात आले होते. या लसीकरण शिबिरामुळे प्रभागातील 70 टक्केच्या वर लसीकरण पूर्ण झाले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर, युवक तालुकाध्यक्ष रणजित पाटील हिवराळे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सादिक पटेल, युवक तालुका सचिव निळकंठ पाटील दुडळे, बिलोली शहराध्यक्ष आनंद गुडमलवार, कुंडलवाडी शहराध्यक्ष नरसिंग जिठ्ठावार, उपाध्यक्ष गंगाधर मरकंटे, हणमंत पाटील खुळगे, नागोराव वाघमारे, राम हातोडे, दादाराव येलमे, पत्रकार रुपेश साठे, सिद्धार्थ कांबळे, सुहास देवकरे, संतोष वाघमारे, नवज्योत कंपाळे, नागनाथ कंपाळे, आरोग्य कर्मचारी वर्षा देवकांबळे, अश्विनी वाघमारे, एस एम डोखले, नगरपालिका कर्मचारी राम वाघमारे,विजय वाघमारे आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते..
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या