विरभद्रा बाल गणेश मंडळ महाजन गल्ली येथे आज कोवीडचे लसीकर सपन्न !

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम दिन याचे औचित्य साधून जिल्ह्यात 17 सप्टेंबर रोजी 75 हजार लसीकरणाचा संकल्प जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेतला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव व यामूळे गत दिड वर्षात बाधितांना सोसावे लागणारे कष्ट लक्षात घेता अधिकाधिक लसीकरण करण्याशिवाय तरणोपाय नसल्याचे अवघ्या जगाच्या लक्षात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने विविध संस्थाच्या माध्यमातून लसीकरणासाठी व्यापक मोहिम हाती घेतली असून सार्वजनिक गणेश मंडळानाही यात पुढाकाराचे आवाहन केले मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड यानी केले होते. या मुळे सगरोळी ता बिलोली येथील विरभंद्रा बाल गणेश मंडळ महाजन गल्ली सगरोळी येथे ही शिबीराचे आयोज करण्यात आले होते.
आरोग्य विभाग, महानगरपालिका, विविध सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमातून जिल्हा भरात 75 हजार लसीकरणाचा हा संकल्प पूर्ण करु असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील या लसीकरण मोहिमेसाठी शहरी व ग्रामीण असे दोन भाग करण्यात आले असून महानगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामीण आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्ह्यातील आरोग्य विभागातर्फे यांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळाना यापूर्वीच समन्वय साधून ठिकठिकाणी लसीकरण शिबिराचे ही आयोजन केले गेले आहे.

महानगरपालिका पातळीवर सर्व वार्ड निहाय सुक्ष्म नियोजन करुन 17 सप्टेंबर रोजी 10 हजार, शहरी कार्यक्षेत्रातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील इतर शासकीय रुग्णालय याठिकाणी 32 हजार डोस लसीकरण करण्याच्या दृष्टीने संबंधित तहसिलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती.
त्याचेच एक भाग म्हणुन सगरोळी प्राथमीक आरोग्य केद्रा चे डाॅ.बालाजी सातमवाड व विरभद्रा बाल गणेश मंडळ महाजन गल्ली सगरोळी यानी ही शिबीराजे आयोजन केले आहे.दुपारी ४ पर्यत २१४ नागरीकानी लस घेतले होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या