सार्वजनिक गणेश मंडळ फुले नगरच्या वतीने 205 जणांना covid-19 लसीकरण !

[ धर्माबाद – नारायण सोनटक्के ]
कोरोना ( Covid-19 ) सारख्या जागतिक महामारीचा परिणाम देशातील विविध सण व उत्सवावर दिसून येत आहे त्यातच गणेश उत्सवावर सुद्धा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे शासनाच्या व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या वतीने आरोग्यविषयक जनजागृतीपर कार्यक्रम साजरे करण्याच्या संदर्भात गणेश मंडळांना सूचना करण्यात आलेल्या आहेत.
याचाच एक भाग म्हणून फुलेनगर येथील सार्वजनिक बाल गणेश मंडळ, पोलिस प्रशासन, ग्रामीण रुग्णालयांच्या संयुक्त विद्यमानाने कोरणा प्रतिबंध लस बद्दल जनजागृती करून सामाजिक उपक्रम म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण शिबिर आयोजित करून तो यशस्वीपणे राबविण्यात मदत केली.
आज दिनांक १५ सप्टेंबर २०२१ ला आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने सार्वजनिक बाल गणेश मंडळ फुलेनगर यांच्या वतीने वैद्यकीय अधिक्षक डॉ.शेख इकबाल, वैद्यकीय अधिकारी लक्ष्मीनारायण केशेटवार, डॉ.विभुते मॅडम, नितीन आडे, लुखाणे ब्रदर, चेतन भाऊ, सिस्टर, नगर पालिका कर्मचारी सूर्यकांत मोखले, लक्ष्मण झुंजारे, राम मुळे व पोलिस कर्मचारी होमगार्ड यांनी उत्कृष्ट लसीकरण करवून घेतले.
लसीकरण सेंटर ला पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक सोहन माछरे, वैद्यकीय अधिकारी यांनी भेट दिली व नियोजन बद्ध कोरोना चे सर्व नियम पाळून लसीकरण करवून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांचे अभिनंदन केले.
पोलिस स्टेशन ग्रामीण रुग्णालय, सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय येथील कोरणा प्रतिबंधक लस शिबिराचे आयोजन करण्यात आलेल्या सेंटर वर फुलेनगर प्रभागातील जवळपास २०५ च्या वर लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
सदर लसीकरण कॅम्प यशस्वी करण्याकरिता गणेश मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर गोस्कुलवाड, शिवाजी गोस्कुलवाड, प्रविण मधनुरे करण राजफोडे मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते श्रीदास वाघमारे व भगवान कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या