निलेश परशुराम मांदाडकर यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान!
मेंदडी गावचे सरपंच मा.श्री निलेश (भाऊ )परशुराम मांदाडकर यांना कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्या मुळे कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले.
●रायगड/म्हसळा ता.प्रतिनिधी प्रा.अंगद कांबळे
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 59 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बॅंकेचे चेरमन आमदार भाई जयंत पाटील यांच्या शुभ हस्ते कोविड योद्धा म्हणून म्हसळा तालुक्यातून खरसई ग्रामपंचायतीचे हरहुन्नरी सरपंच श्री.निलेशभाऊ परशुराम मांदाडकर यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी माजी आमदार पंडितशेट पाटील, अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक, व्हाईस चेरमन सुरेश खैरे साहेब, बॅंकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.प्रदीप नाईक साहेब, बॅंकेचे संचालक श्री.संतोष पाटील श्री तुकाराम महाडिक व मान्यवर संचालक मंडळ उपस्थित होते.