नायगांव पोलीस स्टेशन स.पो.निरीक्षक मा.गजानन पाटेकर साहेब यांना कोवीड-१९ योद्धा सन्मानपत्र गौरव प्रदान!

कंन्ट्रोल क्राईम अन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव्ह ट्रस्टने दिला पुरस्कार!

नायगांव पोलीस स्टेशन स.पो.निरीक्षक मा.गजानन पाटेकर साहेब यांना कोवीड-१९ योद्धा सन्मानपत्र गौरव प्रदान

नायगांव प्रतिनिधी:- 28 आॅक्टोबर

कोरोना व्हायरस / कोवीड-१९ या जागतिक महामारीच्या संकट कालखंडात नायगांव पोलीस स्टेशन चे स.पो.निरीक्षक मा. गजानन गुलाबराव पाटेकर साहेब व पोलीस अधिकारी पोलीस स्टाॅप आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र २४ तास अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत त्यांच्या या उल्लेखनीय कर्तव्य दक्ष जनसेवा कार्याचा सन्मान व्हावा यासाठी कंन्ट्रोल क्राइम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी त्यांना कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र गौरव पुरस्कार देउन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संभाजी शंकरराव पांचाळ,बाळू भाऊ ईबितवार ईकळीकर उपस्थित होते.कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी पत्रकार समाज सेवक साहित्यिक व ईतर बांधव भगिनीं यांच्या मुळेच आज आपण सर्वजण सुखरूप आहोत अशा कोरोना योद्धाचा सन्मान करणे आमचे भाग्य आहे,असे मत ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर आमच्या वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केले,मा.गजानन गुलाबराव पाटेकर साहेब यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे,

ताज्या बातम्या