शालेय शिक्षण समिती सदस्याची मुख्याध्यापकास शिविगाळ : गुन्हा नोंद !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
शालेय गणवेश खरेदी व ग्रामपंचायतने दिलेल्या साहित्याच्या वादातून गडगा येथील मुख्याध्यापकास शालेय शिक्षण समितीच्या सदस्याने शासकीय कामात अडथळा निर्माण करुन अश्लील भाषेत शिविगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. सदर प्रकरणी मुख्याध्यापक गुंडेराव गबाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नायगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रामपंचायत ने काही साहित्य दिले होते ते साहित्य शाळेचे मुख्याध्यापक गुंडीराव भागवत गबाळे यांनी आपल्या ताब्यात घेतले सर्व साहित्य शाळे त घेऊन गेल्यानंतर घेऊन गेल्यानंतर शनिवारी दुपारी बारा वाजता च्या दरम्यान शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य खलीलूला महेबूब सय्यद हे शाळेत आले व मला न विचारता तुम्ही ग्रामपंचायतीचे साहित्य कसे काय आणले असा प्रश्न उपस्थित करून मुख्याध्यापक गबाळे यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करुन अश्लील व शिवराळ भाषेत शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
सदरची घटना शनिवारी दुपारी घडली पण अश्लील शिविगाळ केल्यामुळे घाबरलेले मुख्याध्यापक गबाळे यांनी कुठेही वाच्यता न करता गावाकडे गेले होते. मात्र रविवारी दुपारी थेट नायगाव पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रितसर तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात खलीलूला महेबूब सय्यद यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणला यासह ३५३,२९४,३२३,५०४ व ५०६ अदि कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे करत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या