वाळू प्रकरणाची बातमी का दिलास म्हणून सामाजिक कार्यकर्त्यास जिवे मारण्याची धमकी पोलिसात गुन्हा दाखल !

(विशेष प्रतिनिधी / रियाज पठान)
तालुक्यातील पेणूर येथिल वाळू संदर्भात बातमी का छापलास म्हणून अज्ञात दोन इसमाने गाडी अडवून चाकु दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी लोहा पोलीसात दोन अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाविषयी सविस्तर वृत्त असे की, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार तुळशीराम पांडुरंग लुगारे रा.खाबेगाव हे दि 27 जुनं 2021 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास बाडर दोस्ती धाब्याच्या खदानि जवळ लोहा ते पालम जाणा-या रोडवर शेताकडुन गावाकडे जाताना तुळशीराम पांडुरंग लुगारे यांच्या मोटार सायकल समोर अज्ञात इसमाने गाडी लावून तु पेपरवर बातमी  का दिलास म्हणून मारहाण करून, शिविगाळ करून, चाकु दाखवून या पुढे कशी पेपरवर माहिती दिली तर खतम करण्याची धमकी दिली.

याप्रकरणी लोहा पोलीसांनी 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काँस्टेबल बगाडे साहेब पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या