कुंडलवाडीत गांजा जप्त ; एका आरोपी विरुद्ध गुन्‍हा दाखल !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
     कुंडलवाडी शहरातील हाटकर गल्ली भागात गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून धाड मारून ५ हजार ८०० रूपयांचा गांजा जप्त करण्यात आला असुन एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण यांनी दिली आहे.
       शहरातील हटकर गल्ली गांजाची विक्री होत असल्‍याची माहिती कुंडलवाडी पोलिसांना मिळाल्‍याने दि. ७ जानेवारी २०२२ रोजी सांयकाळच्‍या सुमारास स्‍थानिक पोलिसांनी अचानक आरोपीच्‍या राहात्‍या घरी धाड मारुन ५८०० रुपयाचा गांजा जप्त करुन सहायक पोलिस निरीक्षक करिमखान पठाण यांनी दिलेल्‍या फिर्यादीवरुन आरोपी परमेश्‍वर संभयअप्‍पा स्‍वामी यांच्‍या विरूद्ध गु.र.न.६/२२ कलम २० (‍ब), (२),(बी) एन.डी.पी.अँक्‍ट प्रमाणे आरेापीच्या अंमली पदार्थ गांजा बाळगल्‍या प्रकारणी कुंडलवाडी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हयाची नोंद करण्‍यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, धर्माबादचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी एस.बी.कदम, महेश माकुरवार, सुदर्शन कमलाकर, शेख नजीर, इद्रिस बेग, आर.व्ही.चौहाण, चालक अलीमोददीन, महिला पोलीस सविता कदम यांनी यशस्वीपणे पार पाडली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या