पिक विम्याची 25% रक्कम वाटप करण्याचे परिपत्रक काढा, अन्यथा आंदोलन !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव तालुक्यातील शेतकरी बांधव अगोदर अतिवृष्टीने जमीन खरडुन व पिके वाहुन, अति पावसाने 70 ते 80 टक्के नुकसान झाले असताना, सध्याला 20 दिवस पावसाने ऊघडीप दिल्याने शिल्लक असलेली ऊरली सुरली पिकांना तडण बसली आहे.
 शासन नियमानुसार पिक विम्याची 25% आगाऊ रक्कम वाटप करण्या संदर्भात 8 सप्टेंबर पूर्वी परिपत्रक काढा. अन्यथा तमाम शेतकरी बांधवांना घेऊन आमरण उपोषणाचा इशारा नायगाव तहसीलदार गजानन शिंदे यांना गजानन पाटील होटाळकर यांनी निवेदनाद्वारे दिला.
यावेळी तहसिलदारांनी लागलीचं निवेदनाची दखल घेत संबंधितांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. 8 सप्टेंबर पूर्वी जर पीक विम्याचा 25% सर्व महसूल मंडळ जर बाधित दाखवली नाही तर गजानन पाटील होटाळकर स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी सोबत शेतकरी सुनिल पवार, रामदास उमरेकर, बाबुराव तोंडे, भुजंगराव शिंदे, लक्ष्मण तोंडे, गजानन शिंदे, पाडुरंग पांचाळ व ईतर शेतकरी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या