सांस्कृतिक लोकशाही आघाडीच्या वतीने नरसी येथे समविचारी पक्ष संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक संपन्न!
सांस्कृतिक लोकशाही आघाडीच्या वतीने नरसी येथे समविचारी पक्ष संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.
दि.15-11-2020 रोजी सकाळी ठिक 10:30 वाजता नर्सी येथील शासकीय विश्रामगृहात सांस्कृतीक लोकशाही आघाडीच्या वतीने विविध आंबेडकरवादी पक्ष संघटनेत काम करणार्या सम विचारी कार्यकर्तांची बैठक संपन्न झाली.या बैठकीला धम्मसंगिनी रमागोरख ताई उपस्थीत होत्या व सामाजीक व राजकीय घडामोडीवर मार्गदर्शन केले तसेच सिद्धार्थ सोनकांबळे यांनी पण आपले विचार मांडले .
यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष नागसेन जिगळेकर ,प्रजासत्ताक पार्टीचे बिलोली तालुकाध्यक्ष भास्कर भेदेकर युवा पँथरचे बिलोली तालुकाध्यक्ष इंद्रजीत डुमणे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे बिलोली तालुकाध्यक्ष प्रकाश होनसांगडे व धम्मानंद सोनकांबळे, किशोर वाघमारे, अनिल वाघमारे साहेबराव डुमणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.