हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून संस्कृतीचे जतन ; आंतरभारती शिक्षण संस्थेचा अनोखा कार्यक्रम !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
            बिलोली तालुक्यातील आंतर भारती शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालय व आंतर भारती माध्यमिक विद्यालय या शाळेत मकर संक्रातीच्या अनुषंगाने दिनांक 19 रोजी दुपारी 1 वाजता शाळेच्या माता पालकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम व सांस्कृतिक खेळाचा कार्यक्रम घेण्यात आला तर सदरील कार्यक्रमातून भारतीय संस्कृती जतन करण्यात आले आहे.

         बिलोली येथील नामांकित असलेल्या आंतरभारती शिक्षण संस्थेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मकर संक्रांतीच्या निमित्ताने शाळेच्या माता पालकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमात माता पालकांसाठी विविध सांस्कृतिक खेळाच्या स्पर्धा आयोजित करून अनोखा कार्यक्रम घेण्यात आला.

यामध्ये तळ्यात मळ्यात, संगीत खुर्ची स्पर्धा, उखाणे, बलून फुगवणे, अशा विविध स्पर्धा घेण्यात आले आहेत.तळ्यात मळ्यात या स्पर्धेत प्रथम अश्विनी पोवाडे, द्वितीय सारिका करेवाड, तृतीयअनिता कंदमवार, संगीत खुर्ची प्रथम सारिका करेवाड,द्वितीय गंगामनी महाजन, तृतीय राजश्री निवघे, बलून फुगवने, प्रथम अर्चना उपलंचवार, द्वितीय पूजा शिंदे, उखाणे प्रथम सारिका करेवाड, द्वितीय अहिल्याबाई गुरांनपुरे, तृतीय रंगुबाई शिंदे आदी विजयी माता पालकांना शाळेच्या वतीने मेडल देऊन गौरवण्यात आले आहे तर उर्वरित माता पालकांना शाळेच्या वतीने सर्व पेन, पुष्पगुच्छ, व तिळगुळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात माता पालकांची लक्षणीय उपस्थिती होती.

          या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेच्या उपाध्यक्षा नंदाताई पटने,तर प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्याबाई गुमालदार, मुख्याध्यापिका जयमाला पटणे, महिला पालक प्रतिनिधी राजश्री निवघे, सुजाता महाजन, संतोशिला नरवाडे, मेघा इनामदार, वेशाली कात्रे, शैलजा देशपांडे, राजर्षी लचणे, आदी उपस्थित होते.
तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैलजा पेरके,अंजना होरे, हेमप्रभा पाटील, श्रद्धा पूर्वी,पुष्पा मेहत्रे,आशाताई गुजरवाड, हेमलता अवलोड, रुपाली अपराजे, जयश्री हांडे आदींनी परिश्रम घेतले आहेत, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पूर्वी यांनी केले तर आभार रुपाली अपराजे यांनी मानले आहे..
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या