मंदिराचे टाळी तोडु नावानी चाललेले असंवैधानीक आंदोलन’- दादासाहेब शेळके,भीम टायगर सेना

देशात कोरोना महामारीचे संकट कायम असताना आज ही मनुवादी व सेक्युलर लोकही मताच्या लाचारीपाई लोकाना भावनीक करुन मंदिराची दारे उघडा म्हणून शासणाला वेठीस धरत आहेत.काल परवाच भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यानी मंदीर तात्काळ उघडा अन्यथा मंदिरारी टाळी तोडु असा इशारा दिला.

मुळातच मंदिराची टाळी तोडणे हि दरोडेखोरांची भाषा आहे.संविधानीक देशात अशी दरोड्याची भाषा लोकशाहीला घातक असुन अशी भाषा करणार्याच्या *** शासणाणे हिरव्या पिवळ्या केल्या पाहीजे.कारण 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेत बोलताना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले देशात संवैधानीक मार्ग उपलब्ध असताना कोणी कायदा हाती घेण्याची भाषा करत असेल तर हे लोकशाहीला घातक असुन अश्याची कायदेशीर मस्ती शासणाने वेळीच जिरवली पाहीजे.तसेच भारतीय संविधान भाग चार क “मुलभुत कर्तव्य” Fundamental duties मध्ये आर्टीकल “51 A” ( i ) हिंसात्मक मार्गाचा अवलंब न करणे असे सांगितलेले असताना सुध्दा भाजपा ची अध्यात्म आघाडी ही धर्माच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी मंदिराच राजकारण करत असुन महाराष्ट्रातील मंदीराचे दारे उघडण्या संदर्भात मंदिराचे टाळे तोडण्याची भाषा करत आहेत.

पण भाजप चे शासन असलेल्या राज्यात उदा.उत्तरप्रदेश गोवा,गुजरात राज्यातील राम मंदिर, सोमनाथ मंदीर, मंगेषी सकट मंदीरांचे बंद दारे उघडण्यासंदर्भात ब्र शब्द सुध्दा काढत नाहीत. “याला म्हणतात आपल ठेवा झाकुन, दुसर्याच बघा वाकुन.”व आपल ते बाब्या दुसर्याच्या ते कार्ट यापद्धतीने अध्यात्मिक आघाडीच काम चालु आहे. बर भाजपची अध्यात्मिक आघाडी बौद्ध विहार गुरुद्वारा चर्च ,मास्जीद,चर्च या बद्दल सुध्दा ब्र शब्द काढत नाहीत.

याचाच अर्थ ते मनुवादी जातीवादी विचाराने ग्रासलेले असल्याच सिद्ध होते.मुळातच भारतीय संविधान भाग तिन “मुलभुत हक्क” मधील “धर्म स्वातंत्र्याचा हक्क” write to freedom of religion मध्ये आपल्याला संविधानाने प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्याचा हक्क जरी दिला असला तरी धर्म स्वातंत्र्याचा हक्क उपभोगत असताना जर त्याचा सार्वजनिक सुव्यवस्था,नितीमता व जनतेचे आरोग्य यावर परिणाम पडता कामा नये हे भारतीय संविधानातील कलम 25 (1) मध्ये सांगीतले आहे.

हे अध्यात्मिक आघाडीला माहीत असताना सुध्दा मंदिराचे दारे उघडा अन्यथा आम्ही मंदिराचे टाळी तोडु म्हणुण अशी असवैंधानीक व दरोडेखोराची भाषा करणे म्हणजे आम्ही संविधानाला मानत नाही असा इशाराच अप्रत्यक्षपणे अध्यात्मिक आघाडीने दिला आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात मंदिर व इतर धर्माचे प्रार्थणा स्थळे यापैक्षाही राज्यातील प्रत्येक जाती धर्मातील लोकांचे जीव अत्यंत महत्वाचे असुन ते लोक जिवंत राहीले तरच मंदिर व इतर प्रार्थना स्थळात लोक वंदने ला जातील.

भारतीय संविधान भाग चार “राज्य धोरणाची निदेशक तत्वे” Directive principle of state policy कलम 47 नुसार राज्यातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण हे राज्य शासणाचे प्रथम कर्तव्य आहे.त्यानुसार राज्य शासण कोरोणाला रोखण्यासाठी राज्यातील मंदिर व धर्माची प्रार्थना स्थळ बंद ठेवून लोकाच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. त्यामुळेच ते अभिनंदनास पात्र आहेत.हेच भाजपच्या अध्यात्मिक आघाडीला पंसद नसुन देवा धर्माच्या नावाखाली लोकाना भावणीक करुन धर्माधर्मात भांडणे लावुन आपला राजकीय हेतु साध्य करणे हे त्यांच्या रक्तातच दिसत आहे.यापुढेही कोणी देवा धर्माच्या नावाने कोणी माणसा माणसात भांडण लावुन त्यांचे मुडदे पाडुन मेलेल्या माणसाच्या टाळुवरील लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहेत.

(थोडा भाग वगळला आहे)

जयभीम जय महापुरुष जय संविधान जय भारत..

दादासाहेब शेळके
राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर
मो.8380886935

ताज्या बातम्या