दहिवेल खून प्रकरणातील आरोपीचा जामिन अर्ज मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला – ॲड.सुरेश पिडगेवार यांचा युक्तिवाद यशस्वी

(औरंगाबाद मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल येथील विजय देसले यांचा शेतातील बांधावरून १७ एप्रिल २०२१ रोजी खून झाला होता. या खून प्रकरणात सोनगीर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती.
आरोपी हा मयत विजय याला शेतात पार्टी करुत असे सांगून सोबत घेऊन गेला. दोघे दारू पीत असताना आरोपीने विजय देसले याला शेतातून जाण्या – येण्यासाठी वाट का देत नाहीस म्हणून वाद केला. व त्या वादातून आरोपीने मयत विजय च्या पोटात स्क्रू ड्रायव्हर ने वार करून विहिरीत फेकून दिले आणि वरून मोठा दगड डोक्यात टाकून खून केला.
या प्रकरणात आरोपीस पोलीसांकडून गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. दोषारोपत्र दाखल झाल्यावर आरोपीने अटके विरोधात मा.धुळे येथील सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मा.न्यायालयाने फेटाळला.
सदरील निर्णयाला आव्हान देत आरोपीने औरंगाबाद येथील मा.उच्च न्यायालयात त्यांचे वकिलामार्फत धाव घेतली. सदरील प्रकरण सुनावणी साठी ठेवले असता न्यायमूर्ती एम.जी.सेवलिकर साहेबांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीचा जमीन अर्ज फेटाळून लावला. त्यावेळी फिर्यादी यांची बाजू ॲड.सुरेश पिडगेवार यांनी मांडली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या