दलित सवर्ण यांच्यात एकजूट करणे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मूकनायक शताब्दी सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकारांचा सामाजिक पत्रकारिता पुरस्काराने गौरव !

(ठाणे प्रतिनिधी – सुशिल मोहिते )

(मुंबई) – दलित आणि सवर्ण दोन्ही समाजात एकजूट निर्माण करून समजतील जातीभेद नष्ट करणे हे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन आहे.संविधानाने अस्पृश्यता जातीभेद दूर केले असले तरी काही लोकांच्या मनात अजूनही जातीभेद आहेत. जातीभेद नष्ट करून सामाजिक समता निर्माण करणे हे आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट्य आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
मुंबई मराठी पत्रकार संघात वर्ल्ड बुद्धिस्ट आणि आंबेडकराईट मिशन च्या वतीने मूकनायक शताब्दी सांगता सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. विचारमंचावर महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष नाना पटोले,महापौर किशोरीताई पेडणेकर,मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे; नामा होमियोपॅथी चे संचालक डॉ रामप्रसाद मोरे, प्रदीप जगताप साहेबराव सुरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सामाजिक पत्रकारिता पुरस्काराचे वितरण ना.रामदास आठवले आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले,महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ बिनू वर्गीस, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, किरण सोनवणे यांचा सामाजिक पत्रकारिता पुरस्काराने सत्कार करण्यात आला.

राजकारणात कधी कुणाशी मैत्री करावी लागेल याचा नेम नाही असे सांगत आम्ही दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार आम्ही शिवशक्ती-भीमशक्ती युती केली. त्यातून सामाजिक ऐक्य सौहार्द साधण्याचा प्रयत्न झाला. दलित सवर्ण यांच्यातील सामाजिक अंतर कमी झाले असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

अस्पृश्य वर्ग सामाजिक दृष्ट्या मूक होता त्याकाळात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले. त्याला आज 100 वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल सामाजिक पत्रकारिता पुरस्कार आयोजित केल्याबद्दल ना रामदास आठवले यांनी संयोजकांचे कौतुक केले. यावेळी चंद्रशेखर कांबळे; सोना कांबळे, राजेंद्र जाधव, मनीषा सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या