दलित युथ पँथर ची आदिवासी वाड्यांना भेट !
● दलित युथ पँथर संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव !
दिनांक 4/01/2021/ रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीत असणारी आदिवासी वाडी, मोरे वाडी ला रायगड जिल्हा अध्यक्ष सुशिल भाई जाधव, रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रविण भाई रोकडे, वंजारवाडी शाखा अध्यक्ष मनोज मुखंने, आदिवासी वाड्याची भेट घेतली आणि तिथल्या समस्या जाणुन घेतल्या.
आदिवासी महिला आहेत त्यांना पिढ्या न पिढ्या पाणी 6/7 किलोमीटर आतंरावर जाऊन आणाव लागतंय आणि कुठल्याही प्रकारची पाणीपुरवठा त्या आदिवासी गावाला आज पर्यंत नाही पण दलित युथ पँथर च्या माध्यमातून त्या आदिवासी वाडीला पाणी आणल्या शिवाय आम्ही सर्व पँथर शांत बसनार नाही व त्या आदिवासी वाडी ला पाणीपुरवठा पाणीटंचाई दुरू करून देऊ असा शब्द दलित युथ पँथर रायगड जिल्हा अध्यक्ष सुशिल भाई जाधव यांनी दिला आहे.