दर्गा व मस्जिदच्या सातबारा वरील ईतर अधिकारातील नावे हटवा म्हणून मागणीचे तहसिलदार यांना निवेदन.

[ बिलोली प्रतिनिधी – सुनील जेठे ]
बिलोली शाहरातील ऐतीहासिक कला मस्जिदच्या सातबारा वरील इतर हक्कातील नावे कमी करण्याची मागणी बिलोली तहसिलदार यांच्याकडे करण्यात आली. कला मस्जिद  हे शहिद नवाब सरफराज खॉन यांच्या नावे असलेले सातबारा गट नं ५७७, ५८० मधून त्यांचे नाव कमी करुन ईतर अधिकारात नावे टाकुन जमिनी हडपन्याचे हेतुन सातबारा वरील नाव कमी केले आहे.
इतर अधिकारातील नावे कमी करुन शहिद नवाब सरफराज खॉन यांच्या नावे सातबारा लावाण्याची मागणी मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आली. सदरील  ऐतिहासिक मस्जिद काला दर्गा यांची सेवा प्रशासक नेमणूक करून  या मार्फत करण्यात यावे. येथील वादग्रस्त मुतवलीवर  आपल्या कार्यालया मार्फत तात्काळ  फौजदारी कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात यावे. अन्यथा गावातील मुस्लिम नागरिकांकडून लोकशाही मार्गाने अमरण उपोषण  करण्यात येईल. या मुस्लिम बांधवांच्या आमरण उपोषणाची जबाबदारी प्रशासनावर राहील.याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ही तक्रार करण्यासाठी  ३८० मुस्लिम बांधवांनी पाठींबा देऊन स्वाक्षरी केले असलेले निवेदन मात्र. तहसिलदार याना देण्यात आलेली माहिती मिळाली. यावेळी ए .जी कुरेशी,रफीक पटेल, यांच्यासह ईतर नागरिक उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या