धर्माबाद पोलिस स्टेशन मध्ये दर्पण दिन साजरा ! पत्रकारांचा करण्यात आला सम्मान !

( धर्माबाद प्रतिनिधी – नारायण सोनटक्के  )

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त,धर्माबाद पोलिस स्टेशन मध्ये दर्पण दिन साजरा व पत्रकारांचा सन्मान सोहळा ठेवण्यात आला जो पत्रकार बांधव स्वतः आपल्या परिवारची चिता करत कठीण परिस्थितीत आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींचा आरसा ठरुन सामाजिक बांधिलकी जोपसतो अशा पत्रकार बांधवांना दर्पण दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा व सन्मान सोहळा धर्माबाद पोलिस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक सोहन माच्छरे,अनिल सनगल्ले, गणेश कराड,व संपुर्ण पोलिस बांधवांनी उपक्रम राबविण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरिक्षक सोहन माछरे,प्रमुख पाहूने मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जि.पी.मिसाळे,बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव हनमंते,धर्माबाद पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबुराव पा.आलुरकर उपस्थित होते.

यावेळी मिसाळे जी.पी यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की,बातमीचा मूळ मुदा सोडून इतर खोट्या बातम्या मोठया प्रमाणात छापले जातात, चांगल्या दर्जदार बातम्या असाव्यात,पोलीस प्रशासन नेहमी तत्पर सेवेत असताना त्यांची कुठलीच दाखल घेतली जात नाही हे खंत बोलून दाखवली.पत्रकार व पोलिस यांचे जिव्हाळ्याचे नाते असते अशी भूमिका मांडली व पत्रकार दिन्याच्या सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्राध्यापक श्रीगिरे सर यांनी पि. एच .डी.पदवी मिळवली त्यामुळे त्याचा ही सत्कार करण्यात आला प्रस्तावना सादर केली.प्राध्यापक श्रीगिरे सर यांनी प्रस्तावना सादर केली. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार गंगाधर धडेकर, संजय कदम, बाबुराव आल्लूरकर व काही पत्रकारांची भाषणे झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस कर्मचारी श्री.स्वामी, मसलेकर आणि संतोष आनेराय यांनी परिश्रम केले.

कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार जी.पी. मिसळे सर, बाबुराव आल्लुरकर, बालाजी कुदाळे,भगवान कांबळे, महेश जोशी,लक्ष्मण तुरेराव,अहमद लड्डा, गजानन चंदापुरे, गणपत जठाळकर, नारायण सोनटक्के, शेख खदिर, शेख रझाक, सरफराज (शोएब) अहमद, गंगाधर आलूरोड, किशन कांबळे, शेख जमाल, राजेश सोनांबळे, मतीन सर, सय्यद साजिद आणि विनोद तगडपल्लेवार उपस्थित होते.कार्यक्रमात शेवटी पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले यांनी सर्वांचे आभार मानले.

ताज्या बातम्या