श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंती थाटात साजरी !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास बालसंस्कार त्रिकाल केंद्र दिंडोरी प्रणित नायगाव च्या वतीने आयोजित श्री दत्त जयंती अखंड नाम यज्ञ सप्ताह सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाने थाटात साजरी.

           श्री दत्त जयंती अखंड नाम यज्ञ सप्ताह सोहळ्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित नायगावच्या यानिमित्ताने दिनांक 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर दररोज महिलांसाठी व पुरुषासाठी अखंड नाम सेवा , ग्रामदेवता मान सन्मान मंडळ नित्य स्वाहार मंडळ स्थापना ,अग्नी स्थापना स्थापित देवता हवन, गणेश याग मनोबोध, ,श्री गीताई याग,श्री स्वामी समर्थ याग, चांडी याग, रुद्र याग मल्हारी याग , बली पूर्णहूती , नित्यस्वाहाकार भूपाळी, सामूहिक गुरुचरित्र वाचन नैवेद्य विशेष याग, विशेष सेवा व पारायण ,औदुंबर प्रदक्षिणा ,नैवेद्य व आरती विविध विषयावर , लहान गीतेचा पंधरावा अध्याय विष्णुसहस्त्रनाम वाचन, आदी विविध कार्यक्रम आयोजित होते श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित व्यंकटेश नगर नायगाव बाजार तालुका नायगाव जिल्हा नांदेड यांच्या वतीने थाटात साजरी करण्यात आली आहे.

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या