श्री दत्त जयंती अखंड जप यज्ञ सोहळा दत्त जयंती निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी 

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव येथील जयंती निमित्ताने स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी मंदिरात जयंती अखंड नाम यज्ञ गुरुचरित्र पोथी वाचन पारायण सोहळा दिनांक 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर विविध कार्यक्रमाने संपूर्ण झाला दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

   भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणारे नवसाला पावणाऱ्या अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात श्री दत्त जयंती निमित्ताने संपूर्ण मंदिर सजविण्यात आले होते. दिनांक 19 डिसेंबर मंगळवार रोजी ग्रामदेवता सन्मान मंडळ मांडणी, दिनांक 20 डिसेंबर बुधवार रोजी अग्निस्थापना स्थापित देवता हवन, 21 डिसेंबर गुरुवार रोजी नित्य स्वाहाकार, गणेशायाग, मनोबोधयाग, दिनांक 22 डिसेंबर शुक्रवार रोजी नित्यसहाकार, गीताईयाग, 23 डिसेंबर शनिवार रोजी नित्य स्वाहाकार, स्वामीयाग, 24 डिसेंबर रविवार रोजी नित्यस्वाहाकार, चंडीयाग, 25 डिसेंबर सोमवार रोजी नित्यसहाकार, रुद्रयाग, 26 डिसेंबर मंगळवार रोजी नित्य स्वाहाकार बलीपूर्णाहुती, दुपारी 12 , 39 दत्त जयंती, 27 डिसेंबर रोजी बुधवार सत्यदत्त पूजा, देवता विसर्जन, गुरुचरित्र पोथी वाचन पारायण व नाम जप यज्ञ सप्ताह सांगता सोहळा महाप्रसाद आदी विविध कार्यक्रमाने संपन्न झाला. या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या