नायगाव येथील दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्ताने दर्शनासाठी गर्दी केली

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
येथील नरसी नायगाव महामार्गावर दत्तनगर येथे धंनजे परिवाराच्या वतीने एक मुखी दत्तात्रयाची स्थापना केली होती. या मंदिरात दरवर्षीप्रमाणे जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला.
भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या दत्तनगर येथील एक मुखी दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्ताने पहाटेपासून दत्तनाम जयघोष करण्यात आला.
या निमित्ताने मंदिराच्या वतीने पहाटे दत्तात्रय अनुसया मातेचा करण्यात आला दुपारी दहा ते बारा गुरुचरित्र प्रवचन करण्यात आले साडेबारा वाजता जयंतीनिमित्ताने गुलाल उधळून दत्तात्रयाचा जय घोष करत दत्तात्रयाचा पाळणा महिलांनी म्हणून जयंती साजरी केली सायंकाळी महाप्रसाद ठेवण्यात आला संपूर्ण दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली तर दत्त जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या