दत्तात्रय रातोळीकर यांची महाराष्ट्र नाभिक संघटनेच्या नायगांव तालुका अध्यक्ष पदी निवड

[ नायगांव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
          महाराष्ट्र नाभिक संघटनेच्या नायगांव तालुका अध्यक्ष पदी दत्तात्रय रातोळीकर यांची सर्वानुमते जिल्हाअध्यक्ष याच्यां उपस्थित एका कार्यक्रमात निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळ ही संघटना नाभिक समाजाच्या विविध प्रश्नावर महाराष्ट्र भर काम करत असल्यामुळे सदैव परिश्रम करीत असल्याने त्यांची दखल घेऊन नायगांव येथील मार्कंडेय मंदीर येथे तालुक्यातील सर्व समाज बांधवाची बैठक घेऊन गेली अनेक वर्षापासून स्वतःचा व्यवसाय सांभाळून सामाजिक चळवळीत योगदान देणारे दत्तात्रय गायकवाड रातोळीकर यांची सर्वानुमते नाभिक संघटनेच्या नायगांव तालुका अध्यक्ष पदी निवड करून उपस्थीत मान्यवरांच्या हास्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
या वेळी तालुक्याची उर्वरित कार्यकरणी ही करण्यात आली आहे. या वेळी नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय मोगडपले, युवक जिल्हाअध्यक्ष बाबु गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष मोगलाजी लिंगमपल्ले, दता चपलाक, प्रकाश श्रीमंगले, बालाजी गायकवाड, शंकर कोतवाल, विश्वनाथ गायकवाड, माधव सजन, संतोष नरसीकर, विठ्ठल कोतवाल, सुरेश गायकवाड, साई कंचलवाड ज्ञानेश्वर गंगोत्री, साईनाथ कोतवाल अदीची उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या