श्रीमती कमलबाई शंकरराव लापशेटवार यांचे निधन !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
        येथील जेष्ठ महिला श्रीमती कमलबाई शंकरराव लापशेटवार यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या नांदेड येथील निवासस्थानी दि.२५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, सुना, जावई ,नातवंडे असा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गोवर्धन घाट नांदेड येथील सार्वजनिक स्मशान भूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार असून त्यांची अंतयात्रा बालाजी ˈकॉम्प्लेक्स् महावीर चौक, मल्टीपरपोज हायस्कूल जवळ येथून निघणार आहे. 
श्रीमती कमलबाई लापशेटवार ह्या पानसरे महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक राजू लापशेटवार यांच्या मातोश्री होत.
www.massmaharashtra.com 
Subscribe  सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून

ताज्या बातम्या