डॉ. बालाजी कोंपलवार यांना मातृ शोक !

(धर्माबाद वार्ताहर – चंद्रभीम हौजेकर)

नांदेड येथील पिपल्स कॉलेजचे उपप्राचार्य  तथा बाभळी बंधारा कृती समितीचे सचिव डॉ. बालाजी कोंपलवार यांच्या मातोश्री श्रीमती पार्वतीबाई धोंडिबा कोंपलवार यांचे दि.22 मार्च रोजी सांयकाळी ६-३० वाजता नांदेड येथे दुखद निधन झाले.

गेल्या काही महिन्यांपासून त्या कॅन्सरमुळे आजारी होत्या. मृत्यूसमयी त्यांचे वय ८४ वर्ष होते.

त्यांच्या पार्थिवावर दि. 23.03.202१ रोजी सकाळी १0 वा. गोवर्धनघाट स्मशानभूमी नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

ताज्या बातम्या