सास-याची संपत्ती हडप करण्यासाठी जावयाने दिली जिवे मारण्याची धमकी, कुंटूर पोलिसात गुन्हा दाखल !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
………………………………..
आपल्या गावासह इतर गावांना देखील ज्यांचा आदर्श वाटतो ज्यांनी अनेकांची संसार जोडले परोपकाराने भरीव मदत केली अशा प्रमाणिक सज्जन अंगी वृती व समाजसेवक असलेल्या सासऱ्याची संपत्ती हडप करण्यासाठी जावई यांनी धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याने कुंटूर पोलिसात गुन्हा दाखल झाला परंतु आरोपीला अजून तरी न्यायालयात हजर केले नाही.
वृत असे की, मौजे बळेगाव येथील मुकुंदराव नागोजी बेलकर यांना दोन पत्नी असून पहिल्या पत्नीचे नाव सुमनबाई व दुसरीचे विजयामाला असून पहिल्या पत्नीस सुरेखा व स्मिता अशा दोन विवाहित मुली आहेत व दुसऱ्या पत्नीस सर्वज्ञ मुलगा आणि सत्यभा मुलगी अशी अविवाहित आपत्त्य आहेत, सुरेखा आणि स्मिता यांचे लग्न झाले असून मुकुंदराव बेलकर यांनी पहिली पत्नी सुमनबाई हिच्या नावे साडेआठ एकर जमीन करून दिली व दुसरी पत्नी विजयामाला यांच्या नावाने घर करून दिले, आपली मुलगी स्मिता व जावई रावसाहेब शेषराव मगरे राहणार पिंपळकोठा तालुका मुदखेड यांनी पोळ्याच्या दिवशी मुकुंदराव नागोजी बेलकर यांच्या घरी येऊन सावत्र सासू विजयामाला हीस त्रास देण्यास व शिवीगाळ देण्यास सुरुवात केली.
शेती,घर माझ्या नावावर करून द्या म्हणून जोरजोराने ओरडत असता मुकुंदराव बेलकर म्हणाले मलाही एक मुलगा आहे त्यांच्यासाठी राहू द्या, यावर जावई रावसाहेब अतिचिडुन आपल्या देवासमान असलेल्या सासऱ्यांना धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिला. मुकुंदराव बेलकर यांनी रितसर कुंटूर पोलीस ठाण्यात घडलेला तोंडी जबाब दिला असल्याने सदर ठाण्यात आरोपी रावसाहेब मगरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या