मुख्य बाजारपेठेतील बार ला नगरपालिका प्रशासनाने नाकारली परवानगी !

• नगरपालिका प्रशासनाने जनतेच्या भावनेचा ठेवला आदर !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील मुख्य बाजारपेठेत बार चालू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या त्या संबंधित बारला नागरिकांकडून तीव्र विरोध केला गेला होता,त्यामुळे नागरिकांच्या भावनेचा आदर करत नगरपालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेत संबंधित बारची ना हरकत परवानगी नाकारली आहे.
कुंडलवाडी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा दिनांक 23 नोव्हेंबर रोजी नगर परिषद सभागृहात पार पडली, या सर्वसाधारण सभेतील विषय पत्रिकेतील 06 क्रमांकाचा मुद्दा शहरातील मुख्य बाजारपेठेतील एक मालमत्तेवर बार अँड रेस्टॉरंट हा व्यवसाय चालवण्यासाठी नागरपरिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती.
. या अनुषंगाने सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवण्यात आला होता, या नंतर शहरातील नागरिकांनी सदरील बार व रेस्टॉरंट मुख्य बाजारपेठेत नसावे व त्यासाठी नगरपरिषदेने ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये अशा आशयाचे निवेदन नगर परिषदेकडे देण्यात आले होते. यानंतर नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार, उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार, व महाविकास आघाडीचे नगरसेवक सुरेश कोंडावार, गंगामनी भास्कर, नंदाताई कांबळे, शंकर गोनेलवार, शेख मुख्तार ,सावित्रीबाई पडकूटलावार, प्रयागबाई शीरामे, सचिन कोटलावार,शकुंतलाबाई खेळगे,यांनी सर्वसाधारण सभेतील मुद्दा क्रमांक 06 बार अँड रेस्टॉरंटला ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या विषयी नागरिकांच्या या बारला परवानगी देण्याबाबत असलेल्या विरोध लक्षात घेऊन जनतेच्या भावनेचा आदर करीत सदरील बार व रेस्टॉरंट ना हरकत व परवानगी देण्याचे नाकारले आहे.असे असले तरी भाजपच्या सहा नगरसेवकांनी या ठरावाला विरोध केला होता,तसेच जनतेच्या भावनेचा आदर ठेवल्यामुळे नगरपालिका प्रशासनाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

● नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांची प्रतिक्रिया ! 

सर्वसाधारण सभेत जनभावनेचा आदर करीत सदरील बारला परवानगी व ना हरकत नाकारण्यात आले, पण या विषयाबाबत नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष व भाजपाचे विरोधी पक्षनेते यांनी जन आंदोलन करण्याची भाषा केली, पण या विषयाबाबत ते स्वतः अनुउपस्थित होते,व त्यांच्या मागील सत्‍ताधारी काळात विरभद्र मंदिराजवळ बियर शॉपीस परवानगी दिली.यावरून माजी उपाध्यक्ष यांची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते, त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये.
www.massmaharashtra.com

Subscribe/ सबस्क्राईब करा.

ताज्या बातम्या