दिपक केदार यांच्यावरील गंभीर स्वरुपाचे गुन्हे तात्काळ मागे घ्या – इंद्रजित डुमणे

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वान दिनानिमित्त चैत्यभूमी,दादर मुंबई येथे अभिवादन करण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार आणि कार्यकर्ते गेले आसता मुंबई पोलीस प्रशासनाने मज्जाव केला याचा जाब विचारण्यासाठि गेले आसता त्यांना अटक करून राञी उशीराने त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले तरी गृहखात्याने त्याच्यावरिल व कार्यकत्यावरिल गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. अशी मागणी राज्याचे मुख्यमंञी उध्दवजी ठाकरे यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत डुमणे गागलेगावकर यांनी मेल द्वारे निवेदन पाठवुन केली.
    महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी, दादर मुंबई येथे मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थीत होते परंतु यावेळी प्रशासनाने या ठिकाणी आलेल्या जनतेची व्यवस्था केली नव्हती. यासाठी शिवाजी पार्क खुले करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती याचेच भांडवल करुन आॅल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार व त्यांच्या सहकार्‍यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले समाजहीतासाठी सदैव झटनार्‍या कार्यकर्त्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावी अशी विनंती डुमणे यांनी निवेदनात केली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या