कुंटूर फाट्या जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत गाबण असलेली हरीण ठार – वन मजूर घटस्थळी दाखल !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नांदेड ते नरसी राज्य महामार्गांवर असलेल्या व वनपरीक्षेत्र अधिकारी देगलुर बिलोली यांच्या कार्यक्षेत्रा अंतर्गत असलेल्या कुंटूर फाट्या जवळील वळणावर गाबन असलेली हरीण एका आज्ञात वहानाच्या धडकेत प्रथम गंभीर जखमी झाले होते सदरच्या हरणीला उपचार करण्यासाठी विलंब झाल्यामुळे जाग्यावरच मृत्यू पावले असल्याची घटना घडली आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यानी वेळेवर येऊन जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले असते तर सदरच्या हरणाचा प्राण वाचला असता असे यावेळी जमलेल्या लोकांनी सांगितले असून वनपरीक्षेत्र अधिकारी देगलुर व बिलोलीच्या अधिकाऱ्यानी जर घटनास्थळी दाखल झालेले वन मजूर बालाजी पांडे व गंगनबीड येथील वन मजुर मोरे यांना सूचना दिल्या असत्य तर हरीण वाचली असती असे जनतेतून बोलल्या जात आहे.
सदरच्या जखमी झालेली गाबन हरीण उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्याच्या अधिकाऱ्यानी सूचना दिल्या नसल्यामुळे तर सदरची हरीण घटनास्थळीच तळमळ करीत होती असे वास्तव चित्र दिसून येत असून सदरील हरीनाला कोणत्या तरी आज्ञात वहानाच्या धडकेत प्रथम गंभीर जखमी झाले होते नंतर पावन तासा नंतर सदरची हरीण मरण पावली आहें.
सदरच्या अधिकाऱ्यावर जनतेनी असा आरोप केला असला तरी सदरची घटना दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ ते साडे तीन वाजण्याच्या दरम्यान घडली असली तरी अर्धा पावन तास सदरची हरीण तळमळ करीत असल्याचे दिसून आले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या