पंढरपूर सारखी लॉटरी एकच वेळेस लागते – ना.अशोकराव चव्हाण !

“म.वि.आघाडीच्या प्रचारसभेत प्रतिपादन”
 “जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर”

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
देगलुर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या जाहीर सभेत पंढरपूर सारखी लॉटरी एक वेळेस लागली म्हणजे पुन्हा- पुन्हा लागणार नाही,भाजपसाठी ही निवडणुक एक सट्टा आहे तर कॉग्रेस ही निवडणुक विकास कामावर लढत आहे असे प्रतिपादन ना.अशोकराव चव्हाण यांनी कुंडलवाडीच्या जाहीर सभेत केले आहे.

भाजप माजी नगराध्यक्षांचा कॉग्रेस पक्ष प्रवेश.
कुंडलवाडी येथे महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनिल बेजगमवार, माजी नगरसेवक सयाराम नामतेश, श्रीनिवास जिठ्ठावार, गंगाप्रसाद कानकट्टे, राजेश करपे, दतु हमंद, विनोद कानकट्टे, नागणीचे सरपंच प्रतिनिधी संतोष आगळे आदींनी कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे……

देगलुर- बिलोली पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची जाहीर सभा कुंडलवाडी येथील मुख्य बाजार पेठेत आयोजित करण्यात आले,या प्रचार सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणुन ऩा.अशोकराव चव्हाण यांनी उपस्थीत मतदारांना संबोधताना असे म्हणाले की, कै.रावसाहेब अंतापूरकर यांनी प्रमाणीकपणे या मतदारसंघात विकास कामेे केली.ही निवडणुक महाविकास आघाडीच्या माध्यमातुन जिंकुन ख-या अर्थाने रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली ठरणार आहे.

देगलुर बिलोली मतदारसंघ दत्तक घेत २०० कोटीच्यावर विकास निधी देण्यात आले.भाजपला असे वाटते की ही निवडणुक पुन्हा पंढरपूरसारखी घडेल असे दिवास्वप्न त्यांना पडत आहेत.पंढरपूरची लॉटरी एकवेळेस लागली म्हणजे पुन्हा-पुन्हा लागणार नाही,भाजपसाठी ही निवडणुक एक सट्टा असून कॉग्रेस ही निवडणुक विकासाच्या अजेंडावर लढत आहे,भाजपाने वैयक्तीक टीका करण्यापेक्षा विकास कामावर बोलावे असा मार्मिक सल्लाही दिला.याच जाहीर सभेत महाविकास आघाडीकडून जितेश अंतापूरकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आले….
या प्रचार सभेला अध्यक्ष म्हणुन नगरपालिका अध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार,प्रमुख मार्गदर्शक ना.अशोकराव चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणुन आ.अमरनाथ राजूरकर, मोहनअण्णा हंबर्डे, माधवराव जवळगावकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, अब्दूल सत्तार, मसुदखॉन, बापूराव गजभारे, राष्ट्रवादी ता.अध्यक्ष नागनाथ पा.सावळीकर, राष्ट्रवादी जिल्हा सरचीटणीस संग्राम हायगले, मारोतराव कवळे गुरूजी, बाबाराव एंबडवाड, जितेश अंतापूरकर आदीसह स्थानिक नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते….
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या