पोट निवडणूकीसंदर्भात शिवा संघटनेचे बैठक संपन्न !

लिंगायत समाजाची मते पाहता शिवा संघनेची भुमिका ठरणार निर्णायक – महेश पा.हांडे
बिलोली / गौतम गावंडे
देगलुर बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणूकी कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.सदर पोट निवडणूकीत शिवा संघटनेची भूमिका ठरविण्यासाठी दि.३ आक्टोंबार रोजी बिलोली येथे बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीत मतदार संघाच्या विकासाची,लिंगायत समाजासह शिवा संघटनेला सहकार्य करणाऱ्या उमेदवाराच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेण्यात आला.विशेष म्हणजे या मतदार संघातील लिंगायत समाजाचे मताधिक्य पाहता शिवा संघटनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या देगलुर बिलोली विधानसभा पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहिर होताच या मतदार संघातील विविध पक्ष,संघटनांनी आपआपल्या परिने निवडणूकीला सामोरी जाण्याची तयारी सुरू केली आहे.
सदर मतदार संघात लिंगायत समाजाची संख्या मोठी असल्याने एखाद्या उमेदवाराच्या विजयात लिंगायत समाजाची भुमिका महत्वपुर्ण ठरत आली आहे.या मतदार संघातील बहुसंख्य लिंगायत समाज लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवा संघटनेला मानणारा आहे.त्यामुळे शिवा संघटनेच्या भूमिकेला निवडणूकीत मोठे महत्त्व आहे.
अशातच सध्या होऊ घातलेल्या पोट निवडणूकी संदर्भात शिवा संघटनेचे राज्यउपाध्यक्ष वैजनाथ अण्णा तोनसुरे यांच्या अध्यक्षतेखाली बिलोली येथे दि.३ आक्टोंबर रोजी शिवा संघटनेची महत्वपुर्ण बैठक पार पडली.या बैठकीत होऊ घातलेल्या पोट निवडाणूकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन मतदार संघाच्या विकासाची तळमळ, लिंगायत समाजाची जान व शिवा संघटनेला सहकार्य करणाऱ्या उमेदवाराच्या पाठिशी राहून त्यास मोठ्या मतधिक्याने निवडून आणण्याबाबत एकमत झाले.
पाठिंबा कोणाला द्यावा याबाबत चर्चा करण्यासाठी शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांची लवकर बैठक घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष संभाजी पा बुड्डे, शिवकीर्तनकार मोहनराव कावडे गुरुजी, शिवा कर्मचारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक दगडे, संभाजी पा वारले, जिल्हा प्रवक्ते संतोष पा शिवशेट्टे, तालुकाध्यक्ष महेश पा हांडे, विद्यार्थी आघाडी ता.प्रमुख मनोहर वसमते, सोशलमिडीया ता.प्रमुख महेश साखरे, व्यंकट पा कुरे, शिवाजी पा चंदनकर, गजानन पा दुडले, सदाशिव पा बोडके, अनुप पा डोणगावकर, शंकर पा हुनगुंदेकर, कुरे डोणगाव, कर्मचारी महासंघाचे गंजगुडे, राजू पा खरबाळे, अशोक पा धर्मुरे, अमरदीप दगडे व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या