🔻१००० कोटी रुपयेच निधी उपलब्ध करून देण्याची मागणी.
[ बिलोली ता.प्र- सुनिल जेठे ]
देगलूर – बिलोली विधानसभा मतदार संघातील सिमावर्ती भागाच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार ने १००० कोटीचा रु प्रारुप आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून देण्यात यावा व मंजुर कामावरील स्थगिती उठवण्यात यावी म्हणून मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंञी मा.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन आ.जितेश अंतापुरकर यांनी मागणी केली…
देगलूर – बिलोली मतदार संघ तेलंगाणा व कर्नाटक राज्याच्या सिमेलगत आहे. तेलंगना व कर्नाटक राज्यातील विविध शासकीय योजना व नागरी सुविधांची या सिमावर्ती भागातील नागरीक तुलना करतात.त्यासोबतच या दोन्ही राज्यातील आरोग्य,शिक्षण, रस्ते, उद्योग, कृषी, वीज व इतर मुलभूत सेवासुविधा आपल्या राज्यापेक्षा सरस आहेत.त्यामुळे माझ्या मतदार संघातील सिमावर्ती भागाच्या नागरीकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्या विनंतीवरुन माजी मुख्यमंत्री मा.श्री.अशोकरावजी चव्हाण यांनी सिमावर्ती भागाचा दौरा केला होता व या भागातील पुल व रस्त्याच्या निर्मितीसाठी २०८ कोटी रुपये मंजूर केले होते.परंतु आपल्या या शासनाने या कामांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे लोकांमध्ये अधिकचा रोष वाढलेल्या चर्चेला उधान ऐकायला मिळत आहे.
म्हणून या सर्व बाबींचा विचार करुन माझ्या विधानसभा मतदार संघातील सिमावर्ती गावांच्या विकासांचा प्रारूप आरखडा तयार करावा व या आराखडयामध्ये आरोग्य, शिक्षण, रस्ते,उद्योग,कृषी, वीज या क्षेत्रातील मुलभूत सेवासुविधा निर्माण करण्यासाठी कमीत कमी १००० कोटी रुपयाचा निधी उपलब्ध देण्याची मागणी आ,अंतापूरकर यांनी केला आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy